७/७ ला सरपंच पदाचे नव्याने आरक्षण निघणार…!!!
बारामती
बारामती तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत चे सरपंच पदाचे आरक्षण नव्याने निघणार.दोन महिन्यापूर्वी झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार OBC चा राखीव कोटा वाढवून देण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया पार पडत आहे.
सात सात ला तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत च्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार हे कळणार असून त्यासाठी ग्रामविकास विभागाने आज तसा अध्यादेश काढला आहे.७/७/२५ रोजी १२ वाजता कवी मोरोपंत सभागृह इंदापूर रोड बारामती येथे तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडत होणार आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतेक सरपंच पदाच्या उमेदवारांनी आपली तयारी दोन महिन्यापूर्वी चालू केली होती त्याला यानिमित्ताने खीळ बसणार आहे. निंबुत चे आरक्षण बदलून ते OBC पुरुष/महिला साठी राखीव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,नेमके सात तारखेला हे कळणार आहे…!!!
