धन्यकुमार ऊर्फ कुमारभाऊ जगताप यांची बारामती इंदापूर सुपरवायसिंग युनियन च्या अध्यक्ष पदी निवड…!!
बारामती
बारामती येथे कार्यरत असणारी सचिवांची सहकारी संस्था म्हणून बारामती इंदापूर सुपरवायसिंग युनियन ची ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्रात केडर सोडून ही एकमेव वि का सोसायटी सचिवांची देखरेख संस्था आहे. बारामती तालुक्यातील निंबुत येथील सहकारमहर्षी काकडे बंधूंनी या युनियन ची स्थापना केलेली आहे.बारामती आणि इंदापूर तालुक्यातील वि का सह संस्था या युनियन च्या अखत्यारित येतात. शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतिशभैया काकडे यांच्या मार्गदर्शन खाली हि युनियन चालते.
स्थापनेपासूनच या युनियन वर काकडेचे वर्चस्व राहिलेले आहे. वानेवाडी ता बारामती येथील धन्यकुमार ऊर्फ कुमारभाऊ जगताप यांची काल बारामती इंदापूर सुपरवायसिंग युनियन च्या अध्यक्ष पदी सतिशभैया काकडे यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली.कुमारभाऊ जगताप हे स्वतः वि का सोसायटी चे सचिव म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते.या निमित्ताने युनियन ला अनुभवी सचिव अध्यक्ष म्हणून लाभले आहेत…!!!
.
