किरणदादा गुजर यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार जाहीर…!!!

0
IMG-20250623-WA0053

बारामती

बारामती आणि किरण गुजर यांचं नाव म्हटलं की बारामतीतील सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिकाच आठवल्याशिवाय राहत नाही.बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळाचे ते गेल्या कित्येक वर्षांपासून अध्यक्ष आहेत. किरण गुजर हे नाव राजकारणातील प्रशासकीय कामांसाठी अजितदादा यांचे उजवे हात अशी असणारी ओळख याबरोबर त्यांनी बारामती मध्ये स्वतःची आवड ही आवर्जून जपली असल्याचे गेले चार दशके आपणास पहावयास मिळते.राजकारणाबरोबर,नाट्य, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात सतत समर्पित पणे कार्य करणारे तसेच बारामती मध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणारे व त्यांचे आयोजन व्यवस्थित पार पडणारे कार्यसम्राट किरणजी गुजर यांना पुणे बालगंधर्व रंगमंदिर परिवाराच्या वतीने देण्यात येणारा *बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार* हा नुकताच जाहीर झालेला आहे…!!!

५७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.२६ जून १९६८ रोजी चालू झालेले पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे शहरातील अग्रणी अशा जंगली महाराज रोडवर आहे जे पुणे महानगरपालिका कार्यालयापासून जवळच आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी इथं कायमच असते.यंदाचे बालगंधर्व रंगमंदिर यांचे ५७ वे वर्ष आहे. किरणदादा गुजर यांचे नाट्य,कला आणि सांस्कृतिक समाजकार्यातले योगदान पाहून त्यांना हा विशेष सन्मान बालगंधर्व रंगमंदिर परिवाराच्या वतीने दिला जाणार आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed