निंबुत चे सुपुत्र सुजित काकडे यांची साऊथ आफ्रिका येथे कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वी रित्या पूर्ण…!!!
प्रतिनिधी,निंबुत
निंबुत ता बारामती येथील आणि पुणे जिल्हा बँकेत ब्रँच मॅनेजर या पदावर कार्यरत असणारे श्री सुजित प्रभाकर काकडे यांनी जगातील सर्वाधिक अवघड समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन ही स्पर्धा नुकतीच पूर्ण केली.
ही स्पर्धा साऊथ आफ्रिकेच्या राजधानीत म्हणजेच डर्बन येथे पार पडल्या एकूण ९० किलोमीटर अंतर तब्बल नऊ तास ३० मिनिटांमध्ये पार केलं…!!! याबरोबरच त्यांना रॉबर्ट म्त्शाली मेडल हे मिळाले…!!!
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून प्रमोदकाका काकडे फौंडेशन, निंबुत ग्रामस्थ आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून विशेष कौतुक करण्यात आले.कालच त्यांचे मायदेशी आगमन झालेले असून त्यांना या यशाबद्दल तसेच भावी आयुष्यातील वाटचाली साठी डॉ सौरभ काकडे, ऋषिकेश धुमाळ,गणेश मगर,इंद्रजित काकडे आणि चंद्रशेखर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या…!!!
