माळेगाव कारखाना निवडणूक उमेदवारी अर्ज भरायच्या आज शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे उमेदवारी अर्ज दाखल…!!!
माळेगाव
दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि शिवनगर निवडणुकीची रणधुमाळी २१ मे रोजी दणक्यात सुरू झाली.चिन्ह वाटपावरून सुरू झालेला वाद कुठपर्यंत जातो हे पाहणे नक्कीच औस्तुक्याचे ठरणार आहे परंतु झालेल्या वादानंतर कारखाना परिसरात निवडणूक वातावरण निर्मिती होऊन संपूर्ण परिसर हा ढवळून निघाल्याचे चित्र आहे…!!!
आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत,यासह एकूण ५९३ उमेदवार हे भावी संचालक पदाच्या शर्यतीत आहेत.२१ जागांसाठी यातून खर तर उमेदवारी देत असताना अजितदादा आणि चंद्ररावअण्णा तावरे आणि रंजनकाका तावरे यांचा कस लागणार आहे हे मात्र निश्चित आहे. नाराजी न वाढवता हे करणे दोन्ही पक्षासाठी मोठं आव्हान असणार आहे.खरं तर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलण्याची शक्यता ही नाकारता येऊ शकत नाही.पण जसजसं उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिवस जवळ येतील तसं चित्र स्पष्ट होताना दिसणार आहे.
२०२५/२०२६ ते २०३०/२०३१ या कालावधी साठी होत असलेल्या कारखाना निवडणुकीसाठी माळेगाव गटातून ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, पणदरे गटातून ७९ अर्ज,सांगवी गटातून ५४, खांडज/शिरवली गटातून ६६, निरवागज गटातून ५९,बारामती गटातून सर्वाधिक ७९ अर्ज दाखल झाले आहेत.तर महिलांसाठी राखीव असणाऱ्या २ जागांसाठी ६८ महिला उमेदवार इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. अनुसूचित जाती/जमाती च्या एका जागेसाठी २० अर्ज आणि भटक्या जमातींच्या एका जागेसाठी ६४ अर्ज आल्याने स्पर्धा संचालक पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा रंगतदार आहे.इतर मागास प्रवर्ग साठी २५ अर्ज आणि ब वर्ग साठी २८ अर्ज दाखल झाले आहेत हे अधिकृत आकडेवारी वरून दिसून येते.
पणदरे आणि बारामती गटातून प्रत्येकी ७९ एवढे विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
लवकरच दोन्ही बाजूच्या भूमिका स्पष्ट होणार असल्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळतेय आणि कोणाला मिळत नाही हे पाहायला मिळेल…!!!
