हवामान विभागाकडून जारी करण्यात येत असलेले अलर्ट नेमके किती व कसे असतात?

0
Screenshot_20250526-200324.Google

बारामती
बारामती आणि संपुर्ण महाराष्ट्रात पडत असलेल्या अवकाळी पाऊस हा शंभर वर्षांनंतर होत आहे असे सगळीकडे सांगितलं जातंय,खरं तर मे महिना आणि पाऊस तोही सलग सात दिवस लोकांना सवय नाही नाही याची परंतु हवामानातील बदलामुळे निसर्गाचे चक्र पूर्णतः बदलत चालले असल्याचे आपणाला पाठीमागील काही वर्षापासून दिसत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज सकाळी बारामतीत नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करत असताना,बारामतीत सरासरी पडणाऱ्या एकूण पावसाच्या प्रमाणात या आठवड्यातील पाऊस हा निम्म्याने आहे.एवढा प्रचंड पाऊस मे महिन्यात कोणाही कधीही पाहिलेला नाही.हा फक्त तालुका,जिल्हा पुरता मर्यादित नसून या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याचे आपणास पहावयास मिळते…!!!
हवामान विभागाकडून पाऊस पडत असताना चार प्रकारचे अलर्ट दिले जातात. त्यामध्ये रेड, ऑरेंज, येलो आणि ग्रीन अलर्ट असे असतात.
ग्रीन अलर्ट म्हणजे आपल्या भागात तालुक्यात सर्व काही ठीक आहे,कुठलाही धोका नाही.
येलो अलर्ट म्हणजे हवामानाच्या बदलांमुळे पुढील काही दिवसांत संकट येऊ शकते यासाठी सावधगिरी बाळगावी.
ऑरेंज अलर्ट हा प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटासाठी जनतेने तयार रहावे यासाठी असतो.
तर
रेड अलर्ट हा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी दिला जातो.
हवामान खाते आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून काही वेळापूर्वी येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाची श्यकता वर्तवली आहे.नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच विशेषतः नदीकाठच्या गावांमध्ये अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed