श्री सोमेश्वर सह. कारखान्याकडुन सन २०२१-२२ ते सन २०२४-२५ याचार गाळप हंगामाचे FRP रक्कम विलंबाने दिल्याने त्याचे अंदाजे ५ कोटी ८२लाख रूपये व्याज सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे – श्री सतिशभैया काकडे…!!!

0
InShot_20250519_145722178

गणेशआप्पा फरांदे सहसंपादक
श्री सोमेश्वर सह. साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे या कारखान्यान्याने सन २०२१-२२ सन २०२४-२५ या चार गाळप हंगामामध्ये उस तुटल्यापासुन १४ दिवसांमध्ये उसाची एकरक्कमी FRP देणे कायद्याने बंधनकारक आहे. ती FRP विलंबाने दिल्याने त्याचे जवळपास अंदाजे ५ कोटी ८२ लाख रूपयांच्या वर होणारे व्याजाची रक्कम सभासदांना मिळालीच पाहिजे कारण
सभासदांनी या रक्कमेवर सोसायट्या व बँकेची व्याजे भरलेली आहेत. तसेच चालु वर्षी कोर्टाने देखीलbFRP एक रक्कमी देणे बाबतचा महत्वाचा निकाल दिलेला आहे.

सोमेश्वर कारखान्यास उत्कृष्ठ कार्यक्षमता व इतर कारणांसाठी १० ते १२ पुरस्कार मिळालेलेआहेत. मागील दोन ते तीन वर्षामध्ये सोमेश्वर कारखान्याने जादा उसाचे गाळप करून उच्चांकी कशिंग,चांगला साखर उतारा, उच्चांकी साखरपोती, जादाचे उपपदार्थ उत्पादन व विज निर्मितीमध्ये अग्रेसर असल्याने कारखान्याने मागील काही वर्षापासुन उच्चांकी अंतिम दर दिलेला आहे. असे असतानाही कायम FRP रक्कम विलंबाने देवुन बेकायदेशीरपणे कायद्याचे उल्लंघन करून FRP चे तुकडेही केलेले आहेत.चालु २०२४–२५ हंगामात तर २ महिने विलंबाने कायद्याचा कुठलाही आधार नसताना २८००/- रूपयेच पहिली उचल दिली आहे. व FRP ची उर्वरीत रक्कम ५ ते ६ महिन्याने दिली आहे. तसेच कारखाना प्रशासनाला केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ नुसार विलंबाने दिलेल्या FRP रक्कमेवर १५ टक्के व्याज द्यावेच लागणार आहे व यापुर्वीही कारखान्याकडुन शेतकरी कृती समितीने ते वसुल केलेले आहे.विलंबाने देण्यात आलेल्या अंदाजे FRP ची व्याजाची रक्कम

तपशील

सन २०२१ – २०२२ : १ कोटी ८५ लाख रूपये

सन २०२२ – २०२३ : १ कोटी रूपये

सन २०२३ – २०२४ : ६५ लाख रूपये

सन २०२४ – २०२५ : २ कोटी ३२ लाख रूपये

एकुण : ५ कोटी ८२ लाख रुपये वरील प्रमाणे नमुद केलेली आकडेवारी ही वेळोवेळी आम्हाला कारखान्याच्या मिळालेल्या लेखापरिक्षण अहवालानुसार मिळालेली आहे. या नमुद केलेल्या आकडेवारीमध्ये कमी जास्त तफावत येवु शकते तरी याबाबतचा पत्रव्यवहार कारखाना व साखर आयुक्त कार्यालयास केला असुन याची चौकशी करून व्याजाच्या रक्कमेची पडताळणी व्हावी व सदर रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचे आदेश कारखाना प्रशासनास होणे संबंधी मागणी केली आहे. तसेच याची लवकर चौकशी न केल्यास व सभासदांना न्याय न मिळाल्यास वेळप्रसंगी शेतकरी कृती समिती हायकोर्टाचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन साखर आयुक्त कार्यालय व कारखाना प्रशासना विरूध्द हायकोर्टात दाद मागीतली जाईल असेही साखर आयुक्त साो व कारखाना प्रशासनास लेखी स्वरूपात कळवलेले आहे. (शेतकरी कृती समितीने खोडकी बील १००/ व दुसरा हप्ता २००/- रू प्र.मे.टन अशी एकुण ३०० /- रू प्रमे.टन देण्याची मागणी केली होती परंतु काही जागरूक सभासदांनी कृती समितीससंपर्क करून खोडकी बीलाची माळेगाव प्रमाणे २००/- रूपये व दुसरा हप्ता १००/- रू अशी३००/- रूपये प्र.मे.टन मागणी करण्याची सुचना केली कारण खोडकी ही गेटकेनधारकांना देता येत नाही त्यामुळे कारखान्याचीही रक्कमेत बचत होणार आहे. त्यामुळे सभासदांना शेतीच्या मशागतीचे कामे,उसाच्या लागणी करणे, खते घेणे तसेच मुला-मुलींची अॅडमिशन घेणे बॅक व सोसायटी खाती नवी जुनी करणे यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने कारखान्याने सभासदांचा विचार करून दि. ३१ मे २०२५ पर्यंत खोडकी बील व दुसरा हप्ता सभासदंच्या बँक खात्यावर वर्ग करावा. सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन यांनी हंगाम सन २०२४- २५ मधील पुर्व हंगामी उसाला प्रति टन ७५/- रू. तर सुरू व खोडव्याला १५० /- रू. प्रति मे.टन अनुदान देण्याचे वर्तमान पत्रामधुन जाहिर केले होते. परंतु हंगाम संपुण दोन महिने झाले तरी चेअरमन यांनी जाहिर केलेले अनुदान सभासदांना देणे बाबत भ्र शब्दही काढला नाही. तरी हंगाम सन २०२४-२५ मध्ये जाहिर केलेले अनुदानही तात्काळ ,सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed