भवानीनगर कारखाना निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात, गावागावांच्या कट्ट्यावर चर्चांना ऊत हवा मात्र बापूंच्या कपबशीचीच…!!!
भवानीनगर
१४ मे भवानीनगर ता इंदापूर तालुक्यातील कधी काळी नंबर एक असणाऱ्या कारखान्याची दहा वर्षानंतर होत असलेली निवडणूक, ऐनवेळी विरोधकांनी एकत्र बांधलेली मोट अशा विविध नाट्यमय घडोमोडीनंतर ही निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे.
गावागावांत नागरिक आणि सभासदांचे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे. कारखान्याच्या पश्चिम भागातील काही सभासदांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या.काही सभासदांच्या मते तालुक्यातील राष्ट्रवादी च्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये काम करणाऱ्या नेत्यांकडून दादाचं काम चांगले आहे,दादा काम होत असेल तर हो म्हणून सांगतात आणि नसेल होणार तर हेलपाटे मारायला लावत नाहीत डायरेक्ट नाही होणार म्हणून सांगतात.त्यांचा रोखठोक स्वभाव आणि एक घाव दोन तुकडे करण्याची कार्यपद्धती ही सर्वसामान्य नागरिकांना/ सभासदांना भावते.परंतु त्यांच्या कानात माहिती देणारे नेते हे चांगले नाहीत ते दादापर्यंत वास्तव पोचू देत नाही असे एका गटाचे म्हणणे आहे तर दुसरा गट मात्र याच्या परस्पर विरोधी भूमिका घेताना दिसत आहे यामध्ये दुसऱ्या गटाचे असे म्हणणे आहे की हे खालचे नेते स्वतःकडे मात्र अशा कानात बोलणाऱ्याची,पुढपुढ करणाऱ्यांची फौज ह्यांच्या दिमतीला असते आणि या गावपुढाऱ्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची काम ही लगेच आणि भरपूर प्रमाणात होत असतात.अशा पार्श्वभूमीवर स्थानिकवातळीवरच्या नेत्यांची वरच्या नेत्याकडे अशी तक्रार करणे हे संयुक्तिक ठरत नाही आणि त्यांना तो अधिकार नाही. कारण स्वतःकडे असे खबरी देणारे कार्यकर्ते चालतात पण दादा तुमच्याकडे असे कार्यकर्ते यांना पदावर संधी देऊ नका हे म्हणणे किंवा सांगणे हे कितपत योग्य आहे. याउलट दादा सर्वांचं ऐकून सर्वसामान्य माणसाना दर शनिवारी भेटतात आणि जनतेची कामे मार्गी लावतात.अशा चर्चा गावागावांत पारावर, कट्यावर रंगताना पाहायला मिळत आहे…!!!
विरोधकांनी जरी शेवटच्या क्षणी एकत्र येत मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला सभासद कसा प्रतिसाद देतात हेही पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे…!!!
या सर्वांमध्ये अजितदादा,भरणेमामा आणि पृथ्वीराज बापू जाचक यांच्या भवानी माता पॅनेल चे पारडे जड असल्याचे आजच्या दिवशी तरी कारखान्याच्या पश्चिम भागाच्या गावातील सभासदांच्या चर्चांमधून पहावयास मिळत आहे,त्यामुळे हवा बापूंच्या कपबशी चीच आहे असे म्हणायला हरकत नाही अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर काही सभासदानी व्यक्त केल्या…!!!
