यशवंतनगर ( निंबुत छपरी ) येथे पार पडलेल्या १६ वर्षाखालील हाफ पिच सामन्यांमध्ये चौधरवाडीचा संघ अजिंक्य तर निंबुत क्रिकेट क्लब ( शौर्यजीत ११ ) उपविजेता…!!!

0
IMG-20250514-WA0007

यशवंतनगर

यशवंतनगर ( निंबुत छपरी ) येथे १२ आणि १३ मे रोजी १६ वर्षाखालील हाफ पीच स्पर्धा पार पडली. यामध्ये परिसरातील १८ संघानी सहभाग नोंदवला

. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे रोख रुपये २००१ बक्षीस नंदकुमार काकडे यांनी दिले तर दुसऱ्या क्रमांकाचे १००१ रुपयांचे बक्षीस सतीश दगडे यांनी दिले तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस ७०१ रुपये अभिजित काकडे यांनी दिले.तसेच आलेल्या संघासाठी कोल्ड्रिंक्स व वडापाव याची व्यवस्था अमरभैया काकडे, उदुभैया काकडे,राजेंद्र काकडे यांनी केली.

या स्पर्धा पुणे जिल्हा कृषी औद्योगिक संघाच्या मैदानात पार पडल्या यासाठी किरण काळे, सागर गरदडे,भुजंग चव्हाण आणि राहुल पोळ यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.तर शौर्यजीत काकडे,वरद दगडे, विरजित काकडे,राजवीर काकडे,प्रियजित काकडे, राज जाधव, हर्षद लकडे,राजवीर दगडे,राजवीर येवले यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed