संजय निगडे यांची भाजपा पुरंदर (पूर्व मंडळ) तालुका अध्यक्षपदी निवड.
पुरंदर.
संजय मानसिंग निगडे यांची तालुका भाजपा पुरंदर पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब गरूड, (जिल्हा उपाधक्ष पुणे दक्षिण )यानी जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांचे सुचनेनुसार निवड घोषित केली. निरा येथील अजित नागरी पतसंस्थेत पुरंदर तालुका भाजपा कार्यकर्त्यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली, यावेळी निरा व निरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यात संजय निगडे यांनी मोलाची परिश्रम घेतले आहेत, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी भाजपचे कमळ हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याचे काम केले. त्यांच्या निवडीनंतर नीरा येथे ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
यावेळी भाजपचे गणेश काका जगताप, सचिन लम्बाते, गिशिष जगताप,साकेत जगताप, संदीप कटके, निलेश जगताप,अशोक जोशी, शामराजे कुंभार , श्रीकांत थिटे, बाळासाहेब भोसले, वैजयंती शहा, पांडूरंग निगडे, डॉक्टर संदीप नवले, योगेंद्र माने,उमेश चव्हाण, प्रविण पटेल, राहुल काळे, मचिंद्र लकडे, नितीन दगडे, सोज्वल शहा, अरविंद जेधे, सतिश दुर्वे, बजरंग किन्हाळे, रवी काका देशपांडे, मोहन गायकवाड, नवनाथ बरकडे व ईतर सर्व भाजपा पदाधिकारी याचबरोबर निरा,मुळूंचे, पिंपरे, वाल्हे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व भाजप श्रेष्ठींचे आभार मानले. आगामी काळात भाजपच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करू, कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
सूत्रसंचालन गेल्या काही वर्षापासून निरा शहराची भाजपची धुरा समर्थपणे सांभाळणारे सुरेंद्र जेधे यानी केले. आभार भाजप युवा नेते उमेश चव्हाण यानी मानले.
