निरा डावा कालव्यामध्ये पडले झाड, पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष…!!!
कोऱ्हाळे बु
कोऱ्हाळे बु कठीण पुलनजिक निरा डाव्या कालव्या मध्ये झाड उन्मळून पडले आहे,यामुळे कालव्यातील प्रवाहाला अडथळा निर्माण झालेला आहे याच ठिकाणी निरा डावा कालवा हा काटोकाट भरून वाहत असतो. आणि कठिण पुल येथे रुंद होऊन प्रवाहाचा वेग वाढतो.पाणी तुंबून राहत असल्यामुळे कालवा फुटण्याची ही शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली.
कालवा फुटला तर येथील शेतकऱ्यांच्या शेतीतील चालू पिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे नागरिकांमधून या कालव्याच्या चालू प्रवाहात पडलेले झाड लवकरात लवकर पाटबंधारे विभागाने काढावे अशी आशा येथील शेतकऱ्यांना आहे…!!!
निरा डावा कालवा पाटबंधारे विभाग किती दिवसात कालव्याच्या प्रवाहातील झाड काढते हे पाहणे ओस्तुक्याचे राहील…!!!
