ग्रामपंचायत निरा येथील ग्रामपंचायत च्या मालकीच्या इमारतीतील गाळेधारकांचा प्रश्न चिघळला
गणेश आप्पा फरांदे ९८९००३९२३३
ले 2, 3 महिने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेला ,ग्रामपंचायत निरा येथील गाळे आणि त्यांचl मालकी हक्क, याबाबत काल गाळेधारक यांनी ग्रामपंचायत समोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाकडे न्याय मागितला आहे.
सध्या हे प्रकरण सखोल चौकशी साठी जिल्हा परिषद कडे असून सत्य काय आहे, हे लवकरच समोर येईल, अशी चर्चा आहे.
या प्रकरणाकडे राजकिय दृष्टिकोन ठेऊन पाहिलं जातंय का? आपापली राजकिय पोळी भाजण्यासाठी या विषयाचा वापर होतोय का?
गाळेधारकांना यात न्याय मिळेल का?
या प्रकरणात नक्की दोषी कोण आहे? या विषयावर राजकारण होतेय का?, अश्या अनेक चर्चेला सध्या जिल्ह्यात उधाण आले असून प्रशासन नक्की काय भूमिका घेईल, याकडे जिल्ह्यlचे लक्ष लागले आहे.
