खांडज येथील खून प्रकरणातील आरोपींना माळेगांव पोलिसांनी घातल्या बेड्या…!!!
माळेगांव,बारामती
माळेगांव पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील मौजे खांडज ता बारामती या गावच्या हद्दीत काल दिनांक ७/५/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता वा च्या सुमारास शेतविहिरीत एक पुरुष जातीचे प्रेत तरंगत असले बाबतची माहिती स्थानिकांमार्फत गावाचे पोलिस पाटिल श्री मुनेश राऊत यांना मिळाली लागलीच त्यांनी माळेगांव पोलिस स्टेशन ला कळविले.त्या अनुषंगाने माळेगांव पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी स पो निरीक्षक श्री सचिन लोखंडे व पोलिस उपनिरीक्षक श्री अमोल खटावकर आणि इतर पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत विहिरीतून बाहेर काढले
सदरील व्यक्तीचा मृत्यू हा संशयास्पद झाला असल्याचे असे वाटल्याने आणि चेहऱ्यावर आणि डोक्याला मार लागल्याच्या खुणा तसेच मयताच्या मानेला साडी व दगड बांधलेल्या अवस्थेत मिळून आला.मयताच्या प्रेताचे शवविच्छेदन केलेनंतर संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी मारुती साहेबराव रोमन या व्यक्तीचा मृत्यू हा डोक्यात टणक वस्तुने मारहाण करून झाल्याचा संशय व्यक्त केला,यामुळे मृत्यू हा नैसर्गिक किंवा आत्महत्या नसून तो खून झाल्याचे निष्पन्न झाले.
मयताच्या मुलाने रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर माळेगांव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि जलद तपास करून आरोपी नवनाथ शिवाजी घोगरे वय २५ राहणार कार्ले लोणावळा ता मावळ जि पुणे आणि अनिल गोविंद जाधव वय ३५ राहणार आंबेवाडी ता रोहा जि रायगड यांना अटक केली.सदर गुन्हा हा मयत मारुती साहेबराव पोमण याने आरोपीच्या आईकडे शरिरसुखाची मागणी केली ही घटना आईने मुलाला सांगितल्यानंतर तोच राग मनात धरून आरोपी नवनाथ घोगरे आणि अनिल जाधव या दोघांनी मिळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मयत मारुती पोमण यांचा मुलगा विजय मारुती पोमण यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर गु.र.नं ११७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१),२३८ याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास पोलिस उपनिरिक्षक तुषार भोर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री पंकज देशमुख सो ( भा.पो.से.) पोलीस अधिक्षक;पुणे ग्रामीण,श्री गणेश बिरादार सो अपर पोलिस अधिक्षक;बारामती विभाग, डॉ श्री सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलिस अधिकारी ; बारामती उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर सो यांचे मार्गदर्शनाखाली माळेगांव पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी स. पो. नि. सचिन लोखंडे सो,गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक देवीदास साळवे,अमोल खटावकर,तुषार भोर, स. पो. उपनिरीक्षक संजय मोहिते,पोलिस हवालदार सादिक सय्यद,राहुल पांढरे,विजय वाघमोडे,महिला पोलीस हवालदार रुपाली धिवार,पोलिस नाईक सानप,पोलिस कॉन्स्टेबल मोरे,अमोल राऊत,अमोल वाघमारे,अमोल कोकरे,विकास राखुंडे,जालिंदर बंडगर,सागर पवार,महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनीता पाटील यांनी केलेली आहे…!!!
