पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांना राज्य शासनाचा पुरस्कार…!!!
पुणे
पुणे जिल्हा परिषदेची लोकाभिमुख कामगिरी …!!!
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदय यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबवण्यात आलेल्या “१०० दिवस कृती आराखडा” या लोकाभिमुख उपक्रमात सर्वोत्कृष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद या विभागात पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने उत्तम कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी प्रशासनाने उत्तमरित्या केली आणि हा लोकाभिमुख उपक्रम यशस्वी करून दाखविला…!!! राज्यात पुणे जिल्हा परिषदेला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले,त्याचा स्वीकार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांनी केला. व
पुणे जिल्हा परिषदेच्या या यशस्वी वाटचालीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. लोकाभिमुख प्रशासनाची हीच उज्वल परंपरा यापुढेही अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी, पुणे ग्रामीण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन यापुढेही समर्पितपणे कार्यरत असणार असल्याचे सांगण्यात आले…!!!
