सोमेश्वरनगर येथील कॉलेज मधील तरुणीला एकतर्फी प्रेमातून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडगांव निंबाळकर येथील तरुणावर गुन्हा दाखल…!!!

0
Screenshot_20250427-220436.Google

सोमेश्वरनगर

सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर सायन्स कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करून,एकतर्फी प्रेमातून तु मला खूप आवडतेस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तु मला होकार दे, तू नाही म्हणलीस, तर मी फाशी घेईल. असे म्हणत तरुणीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये वडगाव निंबाळकर येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगांव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार …
२२ जानेवारी २०२५ रोजी ते २६ एप्रिल २०२५ रोजी वेळोवेळी सायन्स कॉलेज सोमेश्वरनगर ता. बारामती, जि. पुणे येथे फिर्यादी तरुणी ही सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर सायन्स कॉलेज सोमेश्वर नगर येथे कॉलेजमध्ये जात होती.ती आय सी टी रूममध्ये अभ्यास करत असताना आरोपी आदित्य साळुंखे रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती हा तरुण फिर्यादी तरुणीकडे वाईट भावनेने पाहून तरुणीला म्हणाला की ‘तु मला खूप आवडतेस’ माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला होकार दे तू नाही म्हणालीस तर मी फाशी घेईन असे म्हणून तरुणीला ब्लॅकमेल करत होता .
संबंधित तरुणीने आदित्य साळुंखे याला म्हणाली की तू मला त्रास देऊ नको, माझे मागे मागे येऊ नको तू माझ्यापेक्षा लहान आहेस तुझ्याविषयी असे काहीही माझ्या मनात काहीही भावना नाहीत.तु माझ्या लहान भावासारखा आहे असे तरुणी म्हणाली तसेच तरुणीने आदित्य साळुंखे यास स्पष्ट नकार दिला असताना देखील आदित्य साळुंखे हा तरुणीच्या काही एक ऐकून न घेता तो त्याची वैयक्तिक रुची वाढवणे करिता तरुणीशी जवळीकता करण्याचा प्रयत्न करून तरुणीशी बोलण्याचा वेळोवेळी प्रयत्न करीत होता.
यावेळी संबंधित तरुणीने त्याच्या भावाला बोलवून घेते असे म्हणून त्यास फोन मागितला असता त्याने फोन दिला नाही. तरुणी ही रूमचे बाहेर जाऊ लागली असता आदित्य याने तरुणी समोर आडवा उभा राहून अडवले तरुणीने त्या ठिकाणी कशीबशी निघून गेली व पुन्हा घरी जाण्याकरिता निघाली असता आदित्य ने तरुणीस थांबविले त्यावेळेस तरुणीने तुझे नाव माझे घरच्याना सांगेन म्हणल्यावर आदित्य साळुंखे याने माझे नाव घरी सांगितलेस तर मी फाशी घेईल अशी धमकी दिली व तरुणी त्या ठिकाणाहून एका बाजूने निघून गेली व हा घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला यावरून तरुणीने आदित्य साळुंखे विरोधात फिर्याद दखल केली .
त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७८,१२६(२),३५१(२),३५१(३) ने गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पो हवालदार भोसले हे करीत आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed