मु सा काकडे महाविद्यालयाच्या सन 2024 – 25 , वार्षिक स्नेहसंमेलनास अतिशय उत्साही वातावरणात प्रारंभ
गणेश आप्पा फरांदे ९८९००३९२३३
मुगुट महोत्सव,2025 या नावाने सुरू झालेले हे स्नेहसंमेलन, आज, 16-1-2025 रोजी, पहिल्या दिवशी,उत्कृष्ट नर्तिका, मिस आयली घिया,यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उदघाटन झालेयांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण ठरले, अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी,त्यांच्यासोबत नाचण्याचा आनंद लुटला., दि,स्पोर्ट्स डे,, मिसमॅच डे, आणि काव्यमैफल चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दुसऱ्या दिवशी दि 17 ला,सुप्रसिद्ध कवी, हनुमंत चांदगुडे आणि भरत दौंडकर हे उपस्थित राहून आपल्या कविता सादर करणार आहेत.
मु सा काकडे महाविद्यालय हे दरवर्षी अश्या प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना वाव द्यायचा प्रयत्न करीत असते.
उदघाटन प्रसंगी ,कॉलेजच्या विकास समितीचे अध्यक्ष अभिजित भैया काकडे दे,, प्राचार्य देविदास वायदंडे,, सचिव, सतीश लकडे,, आणि या महोत्सवाचे प्रमुख काळभोर सर उपस्थित होते.
