निंबुत सरपंच पद आरक्षण सर्वसाधारण असल्याने इतरही प्रवर्गातील सरपंच होऊ शकतो का निर्णय जानेवारीत …???
निंबुत,बारामती
आज दिनांक २३/४/२०२५ रोजी पार पडलेल्या बारामती तालुक्यातील ९८ ग्रामपंचायती ची सरपंच पदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या.यामध्ये जवळ जवळ २९ ग्रामपंचायतीची येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरपंच पदाची निवड जनतेतून होणार असून ते सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आज आरक्षित झाल्या आहेत.यामध्ये तालुक्यातील प्रामुख्याने निंबुत, निरावागज ,शिर्सुफळ या आणि इतर प्रमुख ग्रामपंचायती मध्ये नवीन पदाधिकारी निवड २०२६ साली होणार आहेत.
निंबुत हे गाव राजकीय दृष्टीने बारामती पश्चिम तालुक्यातील महत्वाचे गाव आहे.निंबुत गावातील गुडघ्याला बाशिंग लावून बसणाऱ्या आणि सरपंच पदाची उमेदवारी आपल्याच गळ्यात पडावी यासाठी कित्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली असल्याचं दिसून येतं आहे.उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार हे निश्चित असणार आहे कारण इच्छुकांच्या मांदियाळीत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी अनेक जण आतापासून तयारी करत असल्याचे आणि काही जण तर चार वर्षापासून तयारी करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
नेते ठरवतील तोच सरपंच होणार हे मात्र निश्चित आहे कारणही तसेच आहे.पाठीमागील पंचवार्षिक निवडणुकीचा संदर्भ आहे परंतु नेत्यांच्या मनातील सरपंच हा गुलदस्त्यात असणार हे निश्चित…!!! यामध्ये काही अनपेक्षित घडामोडी निंबुत मध्ये घडू शकतात अशा चर्चा आजपासून च कट्ट्यांवर घडायला सुरुवात झाली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारांची संख्या वाढल्यास इतर प्रवर्गातील व्यक्तीला ही नेते सरपंच पद सर्वसाधारण साठी आरक्षित असल्याने संधी देतात का ते पाहावे लागणार आहे ? ( टिप – या सर्व श्यकता आहेत )
असे घडू शकते का तर ही शक्यता नाकारता येत नाही? त्यामुळे इच्छुकांच्या पोटात आजपासून कालवायला सुरुवात होणार आहे. त्यांचा यावेळी ही भ्रमनिरास होतो का ते पाहावे लागेल…!!!
परंतु नागरिकांतून असा सूर उमटत आहे की नेत्यांनी यावेळी सरपंच पदाचा उमेदवार निवड करत असताना त्याची स्वतःची पाच _ पन्नास मत असावीत आणि अशा सर्वमान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी …!!!
सर्वसाधारण प्रवर्गातून सरपंच हा इतर प्रवर्गातून किंवा महिलाही होऊ शकते हेही तितकंच खरं आहे परंतु येणारी निंबुत ची निवडणूक चुसशीची होणार की बिनविरोध हेही पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे…!!!
