थोर महापुरुषांची केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून चालणार नाही तर त्यांचे विचार तरुणांनी जातीपातीच्या राजकारणात न पडता,मनात रुजवणे ही काळाची गरज…!!!
गणेशअप्पा फरांदे,फरांदेनगर
फरांदेनगर निंबुत येथे श्रीराम मंदिरांच्या प्रांगणात आज सकाळी येथील नागरिकांनी एकत्रित येत समाजातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी फरांदेनगर येथील वक्त्यांची भाषणे झाली,थोर महापुरुषांच्या केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून चालणार नाही, तर त्यांचे विचार मनात रुजवणे ही सध्या काळाची गरज आहे आहे आणि हे जर आपण करू शकलो तरच ती खरी पुण्यतिथी आणि जयंती होईल,,असे मत दत्तात्रय महाराज फरांदे यांनी व्यक्त केले.
यावेळी दिलीप दादा फरांदे,प्रकाश फरांदे, दत्तात्रय महाराज फरांदे,संभाजी फरांदे,विवेक फरांदे,उत्तम फरांदे, नितीन फरांदे ,अभिजीत फरांदे ,रवींद्र जमदाडे कोंडीबा फरांदे, अमोल फरांदे,,,तसेच इतर ग्रामस्थ व सावता माळी तरुण मंडळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…!!!
