भैरवनाथ यात्रेनिमित्त निंबुत येथे भव्य बैलगाड्यांची (ओपन) शर्यत…!!!भैरवनाथ केसरी निंबुत २०२५ इनाम १ लक्ष.
निंबुत
सालाबादप्रमाणे भैरवनाथ यात्रा उत्सव समिती निंबुत व समस्त ग्रामस्थ निंबुत यांच्या वतीने भैरवनाथ केसरी निंबुत भव्य बैलगाडी शर्यत गुरुवार दिनांक २४/०४/२०२५ रोजी निंबुत येथे होणार आहेत.
महाराष्ट्रामधील सर्वात जुनं पारंपारिक मैदान म्हणून निंबुत च मैदान ओळखले जाते. बैलगाडा प्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
यासाठी विक्रमी प्रथम क्रमांकासाठी इनाम १ लाख रुपये इतके ठेवण्यात आले आहे. प्रवेश फी १००० रुपये असून हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार बैलावर पावती नंबर टाकून होणार आहे.या भैरवनाथ केसरी निंबुत २०२५ साठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन निंबुत मधील भैरवनाथ यात्रा उत्सव समिती तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.या मैदानासाठी समालोचक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर तर झेंडपंच म्हणून असिफ मुलानी काम पाहणार आहेत.या मैदानाचे थेट प्रक्षेपण/ प्रसारण STC LIVE या युट्यूब चॅनल वर होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : राजवर्धन काकडे,आदित्य काकडे, कुणाल काकडे, ओंकार काकडे, ओम काकडे व सुमित काकडे
