बारामतीमध्ये भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन – “कृषिक २०२५”

0
krushik_2024

कृषी विज्ञान केंद्र माळेगांव येथील कृषी प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ऊस व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन क्षेत्रात प्रति एकर १२० टन उत्पन्न मिळवून देणारा प्रात्यक्षिक प्लॉट उभारण्यात आला आहे.

नाविन्यपूर्ण फळ झाडांची लागवड, नैसर्गिक शेतीमध्ये देशी भाजीपाला पिकांची प्रात्यक्षिकं, रोबोटिक्स आणि यंत्रसामग्रीची प्रात्यक्षिकं, शेतकामात होमिओपॅथीचा वापर, अत्याधुनिक डच डेअरी तंत्रज्ञान, पशुदालन तसंच सुधारित पीक तंत्रज्ञानाची १७० एकरवरील प्रात्यक्षिकं यांसारख्या कृषी क्षेत्राला विकासाच्या वाटेवर वेगवान करणाऱ्या व शेतकरी बांधवांना समृद्ध करणाऱ्या विविध बाबींचं सादरीकरण प्रदर्शनात करण्यात आलं आहे.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,कृषिमंत्री श्री. माणिकराव कोकाटे, पशु संवर्धन मंत्री पंकजाताई, राजेंद्र जी पवार, बारामती च्या खासदार सुप्रियाताई सुळे,राज्यसभा खासदार सुनेत्रावहिनी पवार,सकाळ उद्योग समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार,श्री नलवडे सर या व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटनसोहळा संपन्न झाला…!!!

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीनं भारतातील सर्वात मोठं प्रात्यक्षिक आधारित “कृषिक २०२५” या कृषी प्रदर्शनाचं आयोजन १६ ते २० जानेवारीपर्यंत करण्यात आलं आहे. तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती KVK कडून करण्यात आली आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed