पवारवस्ती, निंबुत येथील अखंड हरिनाम सप्ताहास एक तप पूर्ण. आजपासून चालू झालेला सप्ताह या वर्षी बारा दिवस चालणार …!!!

0
IMG_20250407_095235635

निंबुत
पवारवस्ती निंबुत येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहास आज सुरुवात झाली.यावर्षी एक तप पूर्ण होत असल्याने हा सप्ताह बारा दिवस चालणार असून बाराही दिवस अन्नदात्यांकडून अन्नदान होणार आहे.
कलशपूजन,विनापूजन आणि ग्रंथपूजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तमदादा जगताप, माजी अध्यक्ष शहाजीकाका काकडे,उद्योजक बाबासाहेब फरांदे, मा व्हाइस चेअरमन शैलेशनाना रासकर, विजयराव काकडे( पाटिलतात्या ),भगवानदादा सोसायटी चे चेअरमन शरद फरांदे, महात्मा फुले सोसायटी चे चेअरमन संभाजी फरांदे,उद्योजक अमर काकडे,उद्योजक गणेश मगर,उद्योजक इंद्रजित काकडे,उद्योजक कोंढळकर,संतोष हाके,गणेश पवार,भगवान कदम इ मान्यवर यांच्या हस्ते करून आज सप्ताहास मार्गदर्शक चालक ह भ प रंगनाथ महाराज देशमुख यांनी सुरुवात झाली असल्याचे सांगितले.
बारा दिवस चालणाऱ्या सप्ताहाची किर्तन वेळ ही सायंकाळी ७ ते ९ असणार आहे आणि भोजन वेळ ९ ते १० अशी असणार आहे असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सूत्रसंचालन व मान्यवरांचे स्वागत श्री सोमेश्वर माझा चे सह संपादक श्री गणेश आप्पा फरांदे यांनी केले तर आभार गणेश पवार यांनी मानले.यावेळी पवारवस्ती, कदमवस्ती, कण्हेरवाडी, फरांदेनगर येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच नितीन कदम,गणेश कदम,योगेश कदम, प्रमोद कदम,किरण फरांदे, पियूष फरांदे,गुलाबराव पवार आणि इतर कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed