शिर्डीला साई दर्शनाला निघण्यापूर्वी, हे बुकिंग केले तर तुमचा घरून निघाल्यापासून घरी पोहोचेपर्यंत अपघात विमा होईल लागू…!!!
शिर्डी
शिर्डी जि अहिल्यानगर येथे साई दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे आपल्याला दिसते.अशातच श्री साई संस्थान शिर्डी यांनी नुकताच एक स्तुत्य उपक्रम हाथी घेतला आहे.
राज्यातून, देशातून तसेच बाहेरील देशातून साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या लाखो साईभक्तांची मांदियाळी शिर्डी येथे जमत असते.आणि या भाविकांचे शिर्डी येथे येत जात असताना मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात,या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थान शिर्डी प्रशासन ने साईभक्तासाठी ५ लाख रुपयांचा अपघात विमा घरून निघाल्यापासून घरी पोहोचेपर्यंत देणार असल्याचे जाहीर केले आहे त्यासाठी आपल्याला हे काम आधी करावे लागणार आहे.
दर्शनाला येण्याअगोदर sai.org.in या साई संस्थान च्या ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन आपल्याला सत्यनारायण महापुजेसाठी १०० रुपयांपासून पुढे,भक्त निवास साठी २५० पासून पुढे तर साई बाबा यांच्या आरती साठी ४०० ते ६०० रुपये यापैकी कोणतेही एक बुकिंग करून या इन्शुरन्स चा साईभक्त लाभ घेऊ शकतात. हे बुकिंग आपण शिर्डी दर्शनासाठी प्रवास करत आहात यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. देशविदेशातून येणाऱ्या साईभक्तांना व त्यांच्या कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे.प्रवासात अपघात किंवा अघटीत घटना घडली तर विम्याची पाच लाख रुपये रक्कम साईभक्त किंवा त्यांच्या कुटुंबियांना साई संस्थान देणार आहे.
