आगामी रामनवमी,रमजान ईद व गुडीपाडवा सणांच्या पार्शभूमीवर,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चा रूट मार्च …!!!
वडगाव निंबाळकर
आगामी राम नवमी,रमजान ईद, गुढीपाडवा सणांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणे कामी दिनांक २२ मार्च २०२५ रोजी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथील ग्राउंडवर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे सो व करंजेपूल दूरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबु योजना रंगीत तालीम सराव सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.तसेच आगामी राम नवमी,रमजान ईद,गुढीपाडवा सण उत्सवाचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे जातीय सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते सदर बैठकीस ५० ते ६० लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता उपस्थित जनसमुदायास नवीन कायदेविषयक तसेच सोशल मीडियावरील स्टेटस, इन्स्टाग्राम वरील रिल्स याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच दि.२४/०३/२०२५ रोजी सायं ५ वा. ते ६.३० वा दरम्यान आगामी रामनवमी,रमजान ईद, गुढीपाडवा सणांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणे कामी मौजे वडगाव निंबाळकर,कोऱ्हाळे बुद्रुक आणि करंजेपुल या गावांचे ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला आहे. याबरोबरच दिनांक २२/०३/२०२५ रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून विविध तक्रारदार यांचे तक्रारीचे निवारण करण्यात आले.
