शंभू राजेंचा हौतात्म्य दिन विशेष …!!! दूध आई धाराऊ आक्का यांच्याविषयी माहिती.
निंबुत
१४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला.त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली.याच आजारपणामुळे शंभूराजांना लहानपणी पुरेसे दूध मिळत नव्हते,त्यामुळे शंभूराजे भुकेने तळमळायचे तेंव्हा शंभूराजांना दूध कोण पाजणार ? ही चिंता राजमाता जिजाऊ मांसाहेबांना सतावू लागली.
याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ या गावी धाराऊ गाडे पाटील ही महिला नुकतीच बाळंत झाली असल्याचे जिजाऊंना समजले तेंव्हा जिजाऊंनी गाडे पाटलांना सांगावा धाडून धाराऊ ना गडावर येण्याची विनंती केली. जिजाऊ मांसाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या.
धाराऊ च्या दुधावर शंभूराजांचे पालनपोषण होऊ लागले.राणी सईबाईंचे आजारपण वाढत गेले आणि १६५९ साली शंभूराजे दोन वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले.शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊ नी आपले मातृत्व शंभूराजांना अर्पण केले.
धाराऊ च्या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी दरवर्षी २६ होन आणि धाराऊ चा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळ गडावर नोकरीस ठेवले. धाराऊ चे पती तुकोजी यांना कापूरहोळ ची पाटीलकी देण्यात आली…!!!
धाराऊ या आजन्म शंभूराजांसोबत राहिल्या,या भूतलावर फक्त दोन च वेळा *भाग्यवान आई* होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे.एक म्हणजे श्रीकृष्णा ची आई यशोदा आणि दुसरी स्वराज्याच्या धाकल्या धन्याची आई धाराऊ आक्का गाडे पाटील…!!!
*जय जिजाऊ.!जय शिवराय..!!जय शंभूराजे…!!!
