निंबूत येथील क्रांती हनुमंतराव काकडे यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथून सूक्ष्मजीवशास्त्रात पीएचडी…!!!
निरा
निंबुत येथील क्रांती हनुमंतराव काकडे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथुन सूक्ष्मजीवशास्त्रात Phd संपादन केली.
२०१८ साली सुरू केलेल्या photorthabdus spl based novel formulation for the sustrainable bicantrol of white grub pest infesting sugarcane { उसावर हल्ला करणाऱ्या पांढऱ्या अळीच्या शाश्वत बायकँट्रोलसाठी फोटोर्थॅबडस एसपीएल आधारित नवीन सूत्रीकरनाचा शोधनिबंध त्यांनी सादर केला } या विषयामध्ये फेब्रुवारी २०२५ यश संपादन केले.
सलग आठ वर्षे त्या या विषयावर गरवारे कॉलेज पुणे याठिकाणी अभ्यास करीत होत्या,यासाठी त्यांना डॉक्टर राजश्री पटवर्धन आणि डॉ गिरीश पठाडे यांचं मार्गदर्शन लाभले…!!!
काही वर्षापूर्वी त्यांनी ऊस शेतीविषयी सोमेश्वरनगर भागातील शेतकऱ्यांना पाडेगाव ऊस संशोधन केंद्र येथे मार्गदर्शन केले होते. विशेषत सोमेश्वर साखर कारखान्याच्या संस्थापक असणाऱ्या गावातील ,कुटुंबातील असलेल्या क्रांती काकडे निगडे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे…!!!
