वाघळवाडी येथे सरपंच,सदस्य आणि ग्रामस्थ यांची अजितदादा यांच्याविषयी उपलब्ध करून दिलेल्या विकासकामे आणि विकासनिधी प्रति कृतज्ञता …!!!!
वाघळवाडी _सोमेश्वरनगर
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी वाघळवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विकासनिधी प्रती अजितदादा यांच्याविषयी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन सरपंच हेमंतकुमार गायकवाड व वाघळवाडी ग्रामस्थ यांनी केले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी दिव्यांग बंधू आणि भगिनींना पाच टक्के निर्वाह निधीचे वाटप करण्यात आले.याबरोबर सर्व गावातील महिलांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी डस्टबिन चे वाटपही करण्यात आले.आणि उमेद अभियान अंतर्गत गावातील १२ महिला बचत गटांना ७ लक्ष रुपयांचे अनुदान वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील कार्यक्रम हा सोमेश्वर चे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तमदादा जगताप यांच्या हस्ते,तर पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन दादा शिंदे,संचालक शैलेश रासकर,ऋषिकेश गायकवाड,लक्ष्मण गोफणे,मिलिंद कांबळे, निरा मार्केट कमिटीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, सतीशराव सकुंडे,विजय सावंत, मा उपसरपंच गणेश जाधव, अजिंक्य सावंत,करंजे गावचे सरपंच हुंबरे, मा सरपंच राजकुमार काशवेद, विशाल हंगिरे,सुचिता साळवे, महिला बचत गटांच्या बारामती तालुका समन्वयक रेश्मा मगर,निशिगंधा सावंत तसेच इतर सदस्य,ग्रामस्थ व महिला भगिनी यांच्या उपस्थित सोपस्कर पार पडला..!!!
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघळवाडी गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच ॲड हेमंतकुमार गायकवाड,सूत्रसंचालन अविनाश सावंत यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार उपसरपंच तुषार सकुंडे यांनी मानले…!!!



