निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेस चे संदिप फडतरे तर उपसभापती पदी अजितदादा राष्ट्रवादी चे बाळासाहेब शिंदे…!!!
निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडी आज मंगळवार दिनांक २५/०२/२०२५ रोजी करण्यात आली. सासवड येथील उपबाजार कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पारपडली. यावेळी काँग्रेसचे संदीप फडतरे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारामती तालुक्यातील बाळासाहेब शिंदे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज सकाळी सभापती व उपसभापती पदासाठी या दोघांचेच उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे या दोघांची अनुक्रमे सभापती आणि उपसभापतीपदी निवड करण्यात आली. निरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी देखील अजित पवार यांचेच वर्चस्व राहिलेले आहे. यापूर्वीचे सभापती शरद जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी कार्यकाळ संपताच राजीनामा दिल्याने सभापती आणि उपसभापतीपद हे रिक्त झाले होते.
निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, शरद पवार एकत्र असताना झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे दहा उमेदवार निवडून आले होते. तर, काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कार्यकाळ ठरवून घेण्यात आला होता. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील संचालक शरद जगताप यांना पहिल्यांदा सभापती करण्यात आले होते.
संजय जगताप यांच्याकडे आठ संचालक आहेत. गेली दोन दिवस रात्र नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने उपसभापती पदावर दावा कायम ठेवत बाजी मारली…!!!
