तुषार सकुंडे यांची वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बहुमताने निवड…!!!
वाघळवाडी सोमेश्वरनगर
वाघळवाडी ता बारामती येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.गणेश जाधव यांनी राजीनामा दिल्याने तुषार सकुंडे व निशिगंधा सावंत या दोघांचा अर्ज उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आल्याने ही निवडणूक झाली.
यामध्ये तुषार सकुंडे यांना १३/१ अशी प्रचंड बहुमताने वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाली.यावेळी सतीशराव सकुंडे,सरपंच हेमंतकुमार गायकवाड ,अजिंक्य सावंत यांसह वाघळवाडी गावातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानंतर वाघळवाडी गावामध्ये विजयी मिरवणूक पार पडली.
