ॲड विशाल बर्गे व ॲड सुप्रिया बर्गे यांची कायदेविषयक माहिती व मार्गदर्शन महाविद्यालयीन युवक व युवती साठी सोमेश्वरनगर च्या शरदचंद्र पवार इंजिनियरिंग कॉलेज व करंजेपुल पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न…!!!

0
IMG-20250204-WA0062

सोमेश्वरनगर

वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजे पूल पोलीस ठाणे व सोमेश्चर शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोमेश्वर नगर. तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वर नगरच्या कॅम्पस मध्ये *अ‍ॅड. विशाल विजयकुमार बर्गे यांनी नवीन फौजदारी कायदा(BNS, BNSS, BSB) व पोलिसांचे अधिकार* या बाबत माहिती दिली. तसेच *अँड सुप्रिया विशाल बर्गे यांनी तरुणींना ‘पोस्को कायदा*’ बद्दल मार्गदर्शन तारीख ०४/०२/२०२५ रोजी केले .

मार्गदर्शन करताना अँड विशाल बर्गे यांनी सांगितले की *पोलिसांना या दुरुस्त कायद्यात जास्त अधिकार दिलेले आहेत. सात वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यातील तपास करताना घटनास्थळ चित्रिकरण करणे बंधनकारक केले आहे* . तसेच पोलिसांना गांभीर् गुन्ह्य़ात दोषारोपपत्र दाखल करायला १८० दिवस पर्यन्त ज्यादा कालावधी दिलेला आहे. पूर्वी ९० दिवसांत तपास पूर्ण करायला लागायचा. तसेच पुरावा गोळा करताना आरोपीचे हस्ताक्षर, सही, हाताचे ठसे, आवाजाचे सॅम्पल जप्त करता येणार आहेत त्याला वेगळी परवानगी कोर्टाकडून घ्यायची गरज नाही. तसेच पूर्वी मात्र आरोपींना सदर पुरावा पोलिसांना देणे बंधनकारक नव्हते. त्यामुळे ठोस पुरावा अभावी आरोपी निर्दोष मुक्त होत होते.आता नवीन दुरुस्ती नुसार तपास करणारे पोलीस अधिकारी यांना ९० दिवसापर्यंत आरोपीची पोलीस कोठडी मागता येणार आहे. पूर्वी केवळ चौदा दिवस मागता येत होती. तसेच इलेट्रोनिक पुरावा म्हणजे ईमेल, मोबाईल, कॉम्प्युटर, मोबाईल एसएमएस हाही पुरावा म्हणून कोर्टात सादर करता येणार आहे.

मुलीना मार्गदर्शन करताना अँड सुप्रिया बर्गे म्हणाल्या की, फसवेपणाला भूलथापांना मुलींनी बळी पडू नये. सरकारी नोकरीत, क्रीडक्षेत्रात, भारतीय लष्करात आता मुलींना आरक्षण दिले आहे. शिक्षण सुद्धा मोफत झालेले आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या पायावर उभे राहून सक्षम बनले पाहिजे. जेणे करून तुमच्या भावी आयुष्यात तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही. तुम्हाला होणाऱ्या अडचणी, लैंगिक छळ, मुलांकडून होणारा त्रास पोलिसांना,घरच्यांना किंवा आईवडील यांना ठामपणे सांगता आला पाहिजे. जेणे करून वेळेत त्यावरीत कारवाई करता येईल व भविष्यातील होणारा एखादा गंभीर गुन्हा थांबवू शकतो.तरुणी ही कुटुंबाची इज्जत असते. ती विवाहानंतर माहेर व सासर चा आधारस्तंभ होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला कमी पणा येईल असे वागले नाही पाहिजे,असे मत त्यांनी व्यक्त केले.तुमचे आईवडील ,नातेवाईक, गुरुजन वर्ग यांना तुमचा अभिमान वाटेल अशीच प्रगती केली पाहिजे. असे सुप्रिया बर्गे वकील यांनी प्रतिपादन केले.

त्यावेळी डॉ संपतराव सुर्यवंशी, प्राचार्य सोमेश्वर सायन्स कॉलेज यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यासह शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेचे प्रो संजय देवकर,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री सचिन काळे साहेब व पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल साबळे साहेब, पोलीस नाईक रमेश नागटिळक, वारुळे साहेब व इतर पोलीस वर्ग, प्राध्यापक कर्मचारी, स्टाफ हे हजर होते.मान्यवरांची ओळख सूर्यवंशी सर यांनी करून दिली. तसेच आभार प्रदर्शन पोलीस नाईक वारुळे साहेब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed