निंबुत छपरी प्राथमिक शाळेत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वही व पेन वाटप संपन्न.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निंबूत छपरी येथे प्राथमिक शाळेत वह्या व पेन वाटप करण्यात आले,त्यावेळी पुणे जिल्हा प्रमुख संजय काळे,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे,तालुकाप्रमुख निलेश मदने,बारामती तालुका निरीक्षक विश्वास मांढरे, उपतालुकाप्रमुख सुदाम गायकवाड,महिला आघाडीच्या उपतालुका प्रमुख सुनीता खोमणे,शाखाप्रमुख प्रताप बामणे व इतर शिवसैनिक तसेच मुख्याध्यापक जाधव गुरुजी व सह शिक्षक सूर्यवंशी गुरुजी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख श्री सुदाम गायकवाड यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव गुरुजी यांनी मानले.
