मु सा काकडे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा…!!! प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांच्या प्राचार्य पदाच्या काळात सुरू झालेली प्रगती सर्वोच्च ठिकाणी…!!!
सोमेश्वरनगर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोच्च, ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीचा मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांना घोषित झाला आहे. मु सा काकडे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांनी प्राचार्य पदाची धुरा सांभाळल्या पासून महाविद्यालयाची व परिसराची भरभराट झाल्याचे आपणांस पहावयास मिळते.
महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिशभैया काकडे देशमुख,अभिजितभैया काकडे,सचिव सतिश लकडे सर तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,प्राचार्य डॉ देविदास वायदंडे सर, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे परिसरातून कौतुक होत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे …!!!

