निंबुत मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिर…!!!
निंबुत प्रतिनिधी
सतिशभैया कल्याणकारी संघ आणि साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रजासत्ताक दिना दिवशी आयोजित केले आहे.
यामध्ये अंजिओप्लास्टी हृदयरोग, मुतखडा, प्रोटेस्ट ग्रंथी,पक्षाघात, मेंदूचे विकार, हाडांची शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, केमोथेरपी कॅन्सर उपचार,कॅन्सर शस्त्रक्रिया इ. रोगांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन केलं जाणार आहे.
हा कार्यक्रम सतिशभैया काकडे, अभिजितभैय्या काकडे,मदनराव काकडे व भीमराव बनसोडे सर यांच्या उपसथितीत संपन्न होणार आहे.बाबालाल काकडे विद्यालयात होणाऱ्या शिबिरासाठी डॉ विद्यानंद भिलारे, डॉ राहुल शिंगटे,डॉ जयश्री भिलारे आणि डॉ शुभम शहा हे तपासणी तसेच मार्गदर्शन करणार आहेत.या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन कर्त्यानी केले आहे

