निरा केमिस्ट असोसिएशन आयोजित मा आमदार जगन्नाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…,,,
सह संपादक – श्री गणेश आप्पा फरांदे
आज दिनांक 24/ 1/ 2025, शुक्रवार, रोजी माजी आमदार श्री. जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ,निरा केमिस्ट असोसिएशन, नीरा ,तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ,यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
या शिबिरासाठी निरा केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष रामदासजी कदम,,, निरा शहरातील सर्व डॉक्टर्स व मेडिकल यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
आज दिवसभरात जवळजवळ साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले ,सर्व रक्तदात्यांचे निरा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून निरा केमिस्ट असोसिएशन नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम निरा शहरात राबवत असते. निरा शहरातील ग्रामस्थांकडून अशा उपक्रमाबाबत नेहमीच असोसिएशनचे कौतुक केले जाते.

