श्री सोमेश्वर कारखान्याचे अनुदाना बाबत फसवे धोरण,सभासदांची दिशाभुल थांबवावी.!! श्री सतिशभैया काकडे
सोमेश्वरनगर,बारामती
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकतीच अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची दिशाभुल केलेली आहे. कारखान्याने कोट्यावधी रूपये खर्चुन विस्तारवाढ केलेली आहे. कारखान्याचे आज १० हजार मे.टन गाळप क्षमतेने गाळप सुरू आहे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत कारखान्याने ४ लाख मे. टनापेक्षा जास्त उसाचे गाळप केलेले असुन १५ मार्च २०२६ पर्यंत ९० दिवसांत सरासरी १० हजार मे. टन गाळपक्षमतेने ९ लाख मे.टन उसाचे गाळप गृहीत धरल्यास १३ लाख मे.टन गाळप पुर्ण होईल..!
परंतु कारखान्याने मार्च महिन्यामध्ये गाळपास येणाऱ्या उसास २०० /- रू. प्रति मे.टन व एप्रिल महिन्यामध्ये गाळपास येणाऱ्या उसास ३०० /- रू. प्रति मे.टन अनुदान जाहिर केलेले आहे परंतु ३१ मार्च २०२६ पुर्वी कारखाना बंद होण्याची शक्यता आहे मग एप्रिल मधील अनुदान कुणाला देणार? त्याचा कोणत्या सभासदांना लाभ होणार का ? त्यामुळे कारखान्याने अनुदानाची जी घोषणा केलेली ती फसवी आहे.वास्तविक सुरू/पुर्व हंगामी व खोडवा उस मोठ्या प्रमाणात कारखान्याच्या कार्यक्षेत्रातुन इतर कारखान्यांना गाळपासाठी बाहेर जातो. यासाठी कारखान्याने जर जानेवारी २०२६ पासुन गाळपास येणाऱ्या उसास अनुदान जाहिर केल्यास व खोडवा उसास ३००/- रू प्र.मे.टन अनुदान जाहीर केल्यास त्याचा फायदा सभासदांना होवुन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस बाहेरील कारखान्यांना गाळपास जाणार नाही..!
तरी चेअरमन व संचालक मंडळाने अनुदानाच्या चुकीच्या घेतलेल्या निर्णयाचा विचार करून त्यामध्ये दुरूस्ती करण्यात येवुन फेरविचार करून जानेवारी महिन्यापासुन गाळपास येणाऱ्या उसास अनुदान जाहिर करावे.(जाहीर केलेले अनुदान सभासदांना द्यावे,गेटकेनधारकांना देवु नये)
