श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याची स्थापनेची कहाणी..!
निंबुत,बारामती
बारामती तालुक्यातील पश्चिमेला निरा नदीकाठी सहकारात आणि राजकारणात अग्रेसर असणारे गाव म्हणून निंबुत गावाची ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात काकडे देशमुख कुटुंबियांना निंबुत व परिसराची वतनदारी मिळाल्यापासून या गावाला वलयं प्राप्त झालं. काकडे कुटुंबियांमध्ये फक्त काकडे देशमुख नसून भावकी मध्ये काकडे इनामदार, पाटील अशा जहागिरी मिळालेली परंपरागत भावकी आहे.काकडे देशमुख कुटुंबियांचे पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्याच्या पाठीमागे निसर्गाच्या सानिध्यात असणारे पांगारे हे मूळ गाव..!
सन १९१९ साली साहेबरावदादा काकडे यांनी वि का सोसायटी ची स्थापना करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. तदनंतर च्या दुसऱ्या पिढीत स्व यशवंतराव, स्व मुगुटरावआप्पा,स्व बाबा,स्व संभाजीलाला,स्व भगवाननाना,स्व शिवाजीअण्णा,स्व रामराव तात्या,स्व सखारामतात्या,स्व आत्मारामआबा आणि शामकाका तसेच तिसऱ्या पिढीत स्व भगवानदादा अशा सहकार महर्षी कुटुंबातील लोकांनी त्यांच्यापरीने निंबुत गावचे नाव महाराष्टाच्या राजकीय पटलावर नेऊन ठेवले..!
महाराष्ट्रातील प्रमुख मातब्बर राजकीय घराण्याशी नातेसंबंध असणारे काकडे देशमुख कुटुंबीय, स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकारणात सक्रिय असणारे काकडे कुटुंबीय संबंध पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध होते. एकेकाळी निंबुत मधून पुणे जिल्ह्यातील विधानसभा आमदारांचे तिकीट वाटप व्हायचे..!
सहकार महर्षी आप्पा आणि लोकनेते बाबा यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम आप्पानी साखर कारखाना उभारणीसाठी पुढाकार घेतला यासाठी परिसरातील पै – पाहुणे बडे शेतकरी आणि बागायतदार सोबत घेऊन १९६० साली श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली पण त्यासाठी बागायती क्षेत्र, उसाची उपलब्धता, सभासद आणि भागभांडवल या गोष्टी महत्वाच्या होत्या..!
यासाठी या लोकांनी सायकल वर फिरून सभासद तयार करून शेअर्स गोळा केले.१९६२ साली कारखाना उभारणी पूर्ण झाल्यानंतर १९६३ साली तत्कालीन केंद्रातील सरंक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे पहिले मा मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते कारखाना पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या स्वागतासाठी हेलिपॅड पासून कारखाना गव्हाणी पर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूने हजारोच्या संख्येने लोक फुलांचा सडा घालून आणि फुलांची उधळण करत स्वागतासाठी उभी होती. हे सर्व चित्र पाहून यशवंतराव चव्हाण भारावून गेले होते..!
१९७० च्या दशकात आप्पा, बाबा आणि सहकाऱ्यांनी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर नंतर इंग्लिश मेडीयम स्कूल,कॉलेज आणि विदयालयाच्या शाखाही काढल्या आणि अशा प्रकारे ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांची शिक्षणाची सोयही या माध्यमातून केली..!
परंतु सुरुवातीला कारखाना कार्यस्थळ हे कोऱ्हाळे गावच्या नजीक असणाऱ्या माळरानात मंजुरी मिळाली होती परंतु आप्पा च्या दूरदृष्टी तुन
( माळेगाव कारखाना आणि आपल्या कारखाना अंतर याचा भाविष्यात प्रश्न निर्माण झाला असता आणि ऊस कार्यक्षेत च्या बाबतीत मर्यादा आल्या असत्या आणि त्यातून स्पर्धा निर्माण झाली असती हे सर्व टाळणे शक्य होते.)
वाघळवाडी आणि वानेवाडी गावच्या हद्दीवर असणाऱ्या खडकाळ माळरानावर सोमेश्वर कारखान्याची उभारणी संस्थापक आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली, यामुळे कारखान्याला बारामती, पुरंदर,फलटण आणि खंडाळा तालुक्यातील ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला.पर्यायाने सोमेश्वर कारखान्याचे रूपांतर सोमेश्वर उद्योग समूहामध्ये झाले आहे आणि या उद्योग समूह,शैक्षणिक संकुल यामुळे सभासदांना, बाजारपेठेला आर्थिक स्थैर्यता प्राप्त होण्यास मदत झाली असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळते..!
*खरं तर आज या भागाचे जे नंदनवन झाले आहे, सहकारमहर्षी आप्पा आणि बाबा या आर्थिक क्रांतीचे जनक आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही..!
*३ डिसेंबर ला आप्पांचा स्मृतीदिन झाला या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन..!🙏🙏🙏
*तळटीप – सदरील लेख उपलब्ध माहिती अनुसार प्रकाशित करत आहोत यामध्ये त्रुटी असू शकतात?*
