निंबुतच्या राजकीय परंपरेतून पत्रकारितेच्या नव्या उंचीवर,‘पुरंदर रिपोर्टर’चे संस्थापक विजय लकडे यांचा अथक परिश्रम, जिद्द आणि जनविश्वासाचा विजयी प्रवास..!

0
IMG-20251130-WA0090

निंबुत, बारामती

निंबुत गावातील प्रतिष्ठित राजकीय घराण्यात जन्माला आलेले पत्रकार विजय लकडे यांना राजकारणतील आवड ही सर्वश्रुत आहे. त्यांचे वडिल राजकारणात सक्रिय होते, तर जेष्ठ बंधू हे निंबुत चे माजी सरपंच होते. त्यानंतर सतीशभैया, शहाजीकाका व प्रमोदकाका यांच्या एकत्रित पॅनल मधून विजय ऊर्फ नाना लकडे हे २०१५ ते २०२० च्या पंचवार्षिक मध्ये वार्ड नं १ मधून निवडून येऊन ग्रामपंचायत सदस्य झाले होते.

नाना लकडे हे पदवीधर असून, दोन वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकारिते- मधील डिप्लोमा अर्थात Ass Journalism चे ही शिक्षण घेतले आहे. साधारणतः २०२१ साली नानांनी पत्रकारिता चालू केली,( अपेक्षा २०२१ साली पुनः सदस्य होण्याची होती परंतु…) त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. समर्पक पत्रकारिता कशी करावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नाना यांनी १० एप्रिल २०२५ चालू केलेला पुरंदर रिपोर्टर हा चॅनेल आहे. अवघ्या सहा महिन्यात सोमेश्वरनगर भागातील विश्वासार्ह व महाराष्ट्राच्या तळागळातील वाचक आणि दर्शक यांच्या पर्यंत पोहोचलेलं वेबपोर्टल आणि यु ट्यूब चॅनेल आहे आणि हे त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमातून साध्य करून दाखवले आहे.

युट्यूब वर अल्पावधितच ४४८ विडिओ आणि 5.86 k subscribers चा टप्पा तर त्यांनी पार केलाच परंतु सोशल मीडिया चा प्रभावी वापर करून अद्भुत अशी कमी कालावधी मध्ये स्वप्नवत कामगिरी फेसबुक वर आज अखेर ३५ k आणि instagram वर ५७ k इतके subacribers करून केलेली आहे..!

नाना खरं तर आपण ग्रामपंचायत सदस्य सहकारी झाल्यापासून गेल्या दहा वर्षातील आपला जवळचा परिचय आहे आणि म्हणूनच प्रथमता आपलं मनःपुर्वक अभिनंदन करतो, आपला शून्य मी जवळून पाहिला आहे आणि पहिल्यांदा ईश्वराकडे प्रार्थना करतो की आपल्या बघितलेल्या शून्याच्या पुढे १ आणि शून्याच्या मागे निरंतर शून्य तहहयात वाढत राहो आणि याबरोबरच आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो यासाठी मनापासून मनःपुर्वक शुभेच्छा..!

नाना खरं तर हे सहज शक्य नव्हतं हे तुम्हाला ही माहिती आहे आणि चॅनेल चालू केल्यानंतर ते चॅनेल चालवणे, टिकवून ठेवणे आणि यशस्वी करून दाखवणे म्हणजे खूप मोठी जोखीम होती आणि चॅनेल चाललं नाही तर प्रतिसाद मिळाला नाही तर ? या तुमच्या मनात चाललेल्या द्वन्द – चा मी साक्षीदार आहे. परंतु या सर्व गोष्टी घडत असताना तुमच्या पाठीमागे वहिनी ठामपणे उभ्या राहिल्या त्यामुळे एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो ही म्हण तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने संयुक्तिक वाटते. तुम्ही जेंव्हा आऊटडोर ला वेगवेगळ्या बातम्यासाठी फिरता तेंव्हा तुमच्या पाठीमागे तुमचा पोल्ट्री व्यवसाय आणि शेती ही वहिनींनी संभाळली यामध्ये तुमची उच्चशिक्षित मुलगी अनिशा ( M tech ) आणि नुकताच Bds च्या तिसऱ्या वर्षाला असणारा मुलगा ओंकार यांचही तितकंच योगदान आहे असं मला वैयक्तिक वाटतं..!

तेंव्हा पुनःश्च मनःपुर्वक अभिनंदन..!

💥 💐💥💐💥💐

✍️चंद्रजित काकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed