समाजकार्यासाठी ओळख ..! करंजेपुल–कांबळेश्वर पंचायत समिती गणातून रेणुका कारंडे चर्चेत..!
वडगांव निंबाळकर
सदोबाचीवाडीचे दिवंगत शिवाजी गणपत (शिवा काका) कारंडे यांचे लोकाभिमुख कार्य आजही पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मनात जिवंत आहे. भोर, पुरंदर आणि बारामती तालुक्यात कृषी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न, योजनांचे मार्गदर्शन, कागदपत्रांची मदत—हे सर्व अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून ते करत..!
गावातील कोणत्याही व्यक्तीला अडचण आली तर शिवा काका स्वतः धावून जात रुग्णालयात भरती रुग्णाला मदत, शाळेची फी, तहसीलमधील अडकलेली कामे किंवा मुलीच्या लग्नाची अडचण, प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुटुंबवत्सल वृत्तीने हात दिला.भारतीय अंध क्रिकेट संघातील खेळाडू अमोल करचे याने वर्ल्डकपसाठी जाताना शिवा काकांनी दिलेली ५,००० रुपयांची मदत आजही सगळीकडे गौरवाने सांगितली जाते. परिसरातील कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी सर्वात आधी वर्गणी देणारे नाव म्हणजे शिवा काका.शेतमजूरांना रोजगार मिळावा म्हणून ‘तननाशक न मारण्याचा’ सल्ला देत त्यांनी शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतीतही सकारात्मक बदल घडवला..!
समाजाचे आपण देणं लागतो—या भावनेतून आयुष्य जगलेल्या त्यांच्या स्मृती आजही ग्रामस्थांना प्रेरणा देतात.याच समाजाभिमुख परंपरेतून प्रेरणा घेत करंजे–कांबळेश्वर पंचायत समिती गणात सौ. रेणुका कारंडे सक्रिय तयारीत असल्याची चर्चा असून, नुकत्याच सोमेश्वर विद्यालय येथे शिवा काका कारंडे फाउंडेशन आयोजित वसंत हंकारे सरांच्या उत्कृष्ठ व्याख्याना मुळे स्थानिकांमध्ये कारंडे यांनाच पंचायत समिती तिकीट मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे..!
