बारामती तालुक्यातील अग्रेसर असणारा सोमेश्वर कारखाना यंदाही राखणार उच्चांकी ऊस दराची परंपरा..! – श्री. पुरुषोत्तम जगताप.

0
IMG_20251108_182450

सोमेश्वरनगर
दि.०८/११/२०२५
राज्याचे उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय मा.ना.श्री. अजितदादा पवारसो यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. गाळप हंगाम सन २०२५-२०२६ साठी कारखान्याची एफ. आर. पी. प्र.मे.टन रु. ३,२८५/- इतकी येत असून कारखान्याने कायमच एफ.आर.पी. पेक्षा जादा ऊस दर दिलेला आहे. या हंगामामध्ये देखिल उच्चांकी ऊस दराची परंपरा सोमेश्वर कारखाना कायम ठेवणार असल्याचे श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. अध्यक्ष जगताप पुढे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी झालेस कारखाना शेतकी खात्याशी संपर्क करावा तसेच सभासदांनी आपला ऊस जळीत करुन तोडणी करणेस संमती देवू नये. ज्या सभासदांना ऊस बीलामधून सोसायटीची रक्कम कपात करावयाची नाही अशा सभासदांनी कारखान्याकडे रितसर अर्ज करावेत.
जगताप पुढे म्हणाले की, गाळप हंगाम सन २०२५ २०२६ साठी सभासद, शेअर्स मागणीदार व कार्यक्षेत्रातील बिगर सभासद यांचे माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.१००/-, माहे मार्च २०२६ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु. २००/- व माहे एप्रिल २०२६ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास रु.३००/- प्र.मे.टन अनुदान देणेत येणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागण करीत असताना ५ फुट सरीमध्येच ऊसाची लागण करावी जेणेकरुन ऊस तोडणी मजूरांच्या टंचाई अभावी ऊसाची तोड ऊस तोडणी यंत्राने करणे सोईचे होईल. गाळप हंगाम २०२६ – २०२७ करीता ऊस तोडणी यंत्राने तोडणी केलेल्या ऊसास प्र.मे.टन रु.५०/- अनुदान देणेत येईल.
सभासद, बिगर सभासद यांनी कारखान्याकडे नोंदविलेला ऊस इतर कारखाना अथवा अन्यत्र विल्हेवाट लावू नये अन्यथा कारखान्याकडून दिल्या जाणाऱ्या सोई-सवलती बंद केल्या जातील त्यामुळे सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये असे आवाहन देखिल श्री. जगताप यांनी यावेळी केले..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed