बारामती पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण पहिल्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण प्रवर्ग …!!!
पुणे
आज रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांच्या सभापती पदाच्या आरक्षण सोडती पुणे जिल्हाअधिकारी यांच्या हस्ते ड्रॉ पद्धतीने काढण्यात आल्या.यामध्ये अनुसूचीत जाती प्रवर्ग १, अनुसूचित जमाती महिला १,OBC पुरुष २,OBC महिला २, सर्वसाधारण महिला ४ तर सर्वसाधारण ३ अशाप्रकारे पहिल्या अडीच वर्षासाठी सभापती पदाच्या सोडती जाहीर झाल्या आहेत…!!!
बारामती पंचायत समिती सभापती पद हे नगरपरिषद नगराध्यक्ष पदाप्रमाणे सर्वसाधारण असल्याने बारामतीत यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपणास चुरस पहावयास मिळणार आहे…!!!
इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नाराज नेत्यांचे प्रमाण यावेळी अधिकच दिसणार आहे,या सर्व कसरती राजकीय पक्ष कशा पद्धतीने हाताळतात हे पाहणे बारामतीकरासाठी औस्तुक्याचे असणार आहे,लवकरच चित्र स्पष्ट होतील…!!!
