माळेगांव च्या स्वीकृत संचालक पदी रामदास आटोळे व विशाल केशवराव जगताप यांची निवड…!!!
माळेगांव,बारामती
आज झालेल्या मीटिंगमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे यांनी दि माळेगांव सह साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास आटोळे आणि विशाल केशवराव जगताप यांची निवड झाल्याचे घोषित केले.
या निवडीमुळे दादांचे सर्वसमावेशक ( सर्व समाजाना बरोबर घेऊन चालणारा नेता ) धोरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. माळेगांव कारखाना परिसरातून या दोन्ही संचालक यांचे अभिनंदन होत असून केशवबापूच्या मुलाला संधी दिल्याने सभासद समाधान व्यक्त होत करत आहेत…!!!
