महाराष्ट्र राज्य मानव अधिकार फाउंडेशन अंतर्गत पुरंदर तालुका अध्यक्षपदी विजय लकडे.
निरा प्रतिनिधी
मानव अधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे पुरंदर तालुका अध्यक्ष पदी दैनिक प्रभात चे पत्रकार, पुरंदर रिपोर्टर लाईव्ह चे संपादक विजय लकडे (मू पो. निंबुत), ता. बारामती, जि. पुणे यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्य मानव अधिकार फाउंडेशनचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.प्रमोद ज्ञानेश्वर फुलसूंंदर यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.
मानव अधिकार फाउंडेशन ही संस्था समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींना संविधानिक न्याय, समता व मानवी हक्कांचे रक्षण मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. अन्यायग्रस्त, पीडित व दुर्बल घटकांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे, सामाजिक सलोखा राखणे, तसेच मुलींच्या सुरक्षिततेसाठी व महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यक्रम राबवणे ही या संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.यावेळी महाराष्ट्र राज्याचे सचिव किशोर शेळके महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य महंमद शेख, मानव अधिकार फाउंडेशन चे पुणे जिल्हा सचिव रमेश कदम उपस्थित होते. नियुक्तीनंतर विजय लकडे यांनी सांगितले की, “मी मानव अधिकार फाउंडेशनच्या आदेशांचे पालन करून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर राहीन.
