निंबुत भागात चोरांचा सुळसुळाट,एकच ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मर ची तीन वेळा चोरी…!!!
निंबुत
निंबुत गावच्या मळई आणि त्या परिसरातील डी पी ची वारंवार चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे.पाठीमागील आठवड्यात या फरशीचा ओढा या मळई भागातील दोन डीपी चोरीस गेलेले आहेत. यामध्ये सूत्रांच्या बातमीनुसार CCTV फुटेजेस सुद्धा चेक केलेले आहेत. यामध्ये एक अनोळखी चारचाकी गाडी या भागात संशयितरित्या फिरताना दिसत आहे. प्रशासनाने मात्र या चोरीच्या घटनेकडे साफ दुर्लक्ष केल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..!एका DP ची चोरी तीन वेळा झाली आहे.
मे महिन्यात झालेल्या पावसानंतर जून,जुलै कोरडा ठणठणीत गेला आहे यामुळे शेतांना पाण्याची गरज आहे परंतु DP चोरीस गेल्यामुळे उभ्या पिकांना पण पाणी देणे शक्य नाहीये त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताक्रांत आहे.यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे…!!!
जिथं सामान्य शेतकरी हा fuse टाकताना सुद्धा घाबरत असतो,त्याठिकाणी DP खाली उतरवून चोरी झाल्याचे दिसत आहे.हे सराईत गुन्हेगारांचे कृत्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे…!!!
