३ ऑगस्ट लोकनेते,सहकारमहर्षी, दानशूर स्व बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांचा स्मृतीदिन…!!!
निंबुत,बारामती
निंबुत बारामती तालुक्याच्या पश्चिमेला निरा नदीकाठी वसलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काकडे देशमुख कुटुंबियांना वतन मिळालेले गाव.याच निंबुत गावातील श्री सोमेश्वर कारखान्याच्या उभारणीत त्यांचे ज्येष्ठ बंधू स्व मुगुटराव आप्पा यांच्या बरोबरीने योगदान असलेले स्व बाबा.१९६० साली सोमेश्वर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवत असताना आप्पा,बाबा आणि सहकाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याची स्थापना केली…!!!
स्वतः आप्पा आणि बाबा यांनी त्याकाळी सायकल वर फिरून सोमेश्वर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांचे शेअर्स गोळा केले.आज कारखान्याची जी प्रगती झाली आहे आणि जो विस्तार दिसत आहे व यामुळे सोमेश्वरनगर परिसरात वैभवाचे दिवस आले आहेत त्याची सुरुवात या सहकारमहर्षी बंधूंनी १९६० साली केली होती.खरं तर पूर्वजांनी लावलेल्या झाडाची फळे ही दुसऱ्या,तिसऱ्या पिढीत चाखायला मिळतात…!!! परंतु आज जो विकास सोमेश्वरनगर परिसराचा जो विकास झाला आहे, याचा आजच्या तरुण पिढीला विसर पडला आहे…!!! ( लवकरच सोमेश्वर कारखाना सोमेश्वरनगर भागात कसा आला याविषयीची माहिती पुढील भागात आपणास वाचायला मिळणार आहे.)
निंबुत भागात नव्हे तर तालुक्यात आणि जिल्ह्यातही बाबांचे वर्चस्व होते हा इतिहास आहे.नाण्याला नेहमी दोन बाजू असतात समर्थक प्रशंसा करत असतात तर विरोधक टीका परंतु बाबांच्या विषयी टीका करणारे कमी आणि बाबांची प्रशंसा करणारे अधिक असल्याचे आपणास पहावयास मिळते…!!!दिलदार,दानशूर,लोकनेते, सहकारमहर्षी अशा कित्येक बिरुदावली त्यांच्या नावापुढे आजही लागताना दिसतात.बाबांना जाऊन बरीच वर्षे झाली आहेत परंतु मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा सहवास मला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लाभला हे मी माझे स्वतःचे भाग्य समजतो…!!!
माझ्या जीवनात मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना साल २००४ चे होते मी द्वितीय वर्षात मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात त्यावेळी शिकत होतो.त्यावेळी बाबांनी मला आणि आमच्या गावातील अजून चार पाच जण यांना मंत्रालयात घेऊन गेले होते.बाबांचे स्नेही असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण त्यावेळी परिवहन मंत्री होते.परिवहन खात्यात त्यावेळी ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची भरती चालू होती,त्या भरती संदर्भात गावातील काही मुले ST खात्यात कामास लावायची होती त्यासाठी आम्ही मंत्रालयात गेलो होतो. त्यावेळेस बाबांच्या बरोबर झालेला आमचा पाहुणचार पाहून आम्ही सर्व जण भारावून गेलो होतो.खऱ्या अर्थाने बाबांचा असणारा दबदबा आम्ही मंत्रालय परिसरात अनुभवत होतो…!!!त्यानंतर काळात बाबांनी मला कॉलेज वर युवा सेनेची शाखा काढ असाही सल्ला दिला होता,आपण शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून मोठा कार्यक्रम घेऊ असे म्हटले होते परंतु त्यास काही कारणास्तव विलंब झाल्याने आम्ही आमच्या गावात शिवसेना शाखेची स्थापना त्याकाळी केली होती…!!! त्यावेळी माझ्याबरोबर माझे सहकारी म्हणून राजू काळे हेही असायचे…!!!
खरं तर बाबांच्या स्मृतिदिनी सांगण्या सारख्या आठवणी भरपूर आहेत परंतु आपण या माध्यमातून काही कालांतराने थोड्या थोड्या आठवणी सांगणार आहोत…!!!असो अशा या रुबाबदार,दानशूर व्यक्तिमत्वास या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…!!! 🙏 🙏 🙏
*लोकनेते सहकारमहर्षी स्व बाबालाल साहेबराव काकडे देशमुख*
( लेखक : कमी वयात जास्त अनुभव असणारा अन् निंबुत गावातील सर्व दिग्गज असणाऱ्या नेत्यांबरोबर काम केलेला एकमेव पहिल्या फळीतला कार्यकर्ता…!!! )
