मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा निंबुत छपरी येथे विद्यार्थ्यांना सालाबादप्रमाणे लेखन साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न…!!!
निंबुत
शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा निंबुत छपरी येथे लेखन साहित्य वाटप कार्यक्रम सालाबादप्रमाणे शिवसेना उबाठा गटाचे बारामती तालुका समन्वयक सुदाम गायकवाड यांनी आयोजित केला होता.साधारणतः ३९ पटसंख्या असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत छपरी येथे हा कार्यक्रम दरवर्षी पार पडत असतो…!!!
यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विलासतात्या शेवाळे व शिवसेना जिल्हा संघटक ॲड राजेंद्र काळे हे होते.या कार्यक्रमासाठी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे,बारामती तालुका प्रमुख निलेश मदने, उपतालुकाप्रमुख संभाजी शिंदे,तालुका समन्वयक सुदाम गायकवाड, विधानसभा क्षेत्रप्रमुख बंटी गायकवाड, संपर्क प्रमुख आदिराज कोठडीया,जिल्हाप्रमुख महिला आघाडी ज्योतीताई गाडे,विभागप्रमुख भगवान गोफणे,जाधव गुरुजी,सूर्यवंशी गुरुजी तसेच शिवसैनिक इ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते…!!!
