समता नागरी सह पतसंस्थेच्या सासवड शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न…!!!

0
IMG-20250728-WA0001

सासवड

गणेश फरांदे सहसंपादक

निरा येथील नावाजलेली समता नागरी सह पतसंस्थेच्या सासवड शाखेचा उद्घाटन सोहळा सहकार आयुक्त दिपक तावरे आणि अनिल कवडे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपदादा फरांदे या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला…!!!उद्घाटन प्रसंगी सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे आवर्जून कौतुक केले आणि अध्यक्ष दिलीपदादा फरांदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना मा सहकार आयुक्त व निवडणूक आयुक्त अनिल कवडे साहेब यांनी संस्थेच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेत असताना इतर सहकारी संस्थानी समता पतसंस्थेचा आदर्श घेण्याचे आवाहन केले आणि अध्यक्ष,संचालक मंडळ, सचिव व कामगारांचे ही यामध्ये विशेष योगदान आहे त्यामुळे त्यांचेही कौतुक केले ..!!!

निरा येथील नावाजलेली आणि अल्पावधीत ठेवीदारांचा विश्वास करणारी संस्था म्हणून ओळख असणारी समता नागरी सह पतसंस्थेच्या बारामती,हडपसर नंतर आता सासवड शाखेचे उद्घाटन करून संस्थापक अध्यक्ष यांनी ग्रामीण भागात लावलेलं एक छोटस रोपट आणि २५ वर्षांनंतर त्याचा झालेला वटवृक्ष ही स्वप्नवत कामगिरी पार पाडली आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपदादा फरांदे यांनी २००० साली सुरू केलेली ही पतसंस्था नावारूपास आलेली आपणास पहावयास मिळते.सुरुवातीला त्यांनी अभ्यासू संचालक मंडळ आणि कुशल कामगार यांच्यावर भर देऊन निरा व परिसरातील ठेवीदारांचा विश्वास संपादन केला व हळूहळू संस्थेचा विस्तार केला.दादांची एक विशिष्ठ कार्यपद्धती आहे ज्यामध्ये स्वतः वैयक्तिक कर्जदार,ठेवीदार किंवा दैनंदिन अल्पबचत करणारे व्यावसायिक असतात यांच्याशी संपर्क साधतात.इतक्या मोठ्या संस्थेचा अध्यक्ष हा आजही ग्राऊंड लेवलवर काम करतो आणि हेच प्रमुख कारण आहे या संस्थेच्या विकासाचे आणि विस्ताराचे…!!!समता पतसंस्थेच्या माध्यमातून परिसरातील समाजातील कित्येक कामगारांच्या तसेच व्यावसायिकांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे दिलीपदादा हे जनक आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही याच माध्यमातून कामगारांच्या कुटुंबांची प्रगती परिसरात आपणास पहावयास मिळते…!!!

संस्थेच्या निरा या मुख्य शाखेसह बारामती, हडपसर आणि सासवड या अन्य शाखा आहेत.युवराज फरांदे हे संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचे सचिव म्हणून काम पाहतात.कामगारांना शिस्त लावण्याचे काम आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे ही काम त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडले आहे.सभासद हा कर्जदार,ठेवीदार,पिग्मी असो किंवा कामगार असो आदर आणि सन्मान याठिकाणी सर्वांना सारखाच मिळतो. संस्थेचे व्यवस्थापक म्हणून राहुल ढोले काम पाहतात.२५१ कोटी ठेवी असलेली,, परिसरातील चार ते पाच तालुक्यातील एकमेव पतसंस्था,,,म्हणून एक वेगळी विशेष ओळख,थकीत कर्जदाराला वसुलीचा तगादा लावण्यापेक्षा त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारी पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक याचबरोबर काही वर्षापूर्वी संस्थेने स्वतःची जागा घेऊन अद्ययावत सर्वसोयीसुवधा युक्त कार्यालय ही उभारले आहे ज्यामध्ये AC हॉल ही उपलब्ध आहे…!!!

या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या दिलीपदादा फरांदे यांना दूरदृष्टी असणारे आधुनिक काळातले सहकारमहर्षी ही उपाधी संयुक्तिक ठरते.सहकार रुजवात असताना तो टिकला पाहिजे आणि ठेवीदारांचा विश्वास संपादित राहीला पाहिजे यासाठी सोबत अभ्यासू संचालक मंडळ आणि कुशल कामगारांची साथ ही हवी असते हे ओळखणारा अध्यक्ष म्हणचेच दिलीपदादा फरांदे…!!!

या उद्घाटन सोहळ्याला पुणे जिल्हा बँकेचे दुर्गाडे सर,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते,जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले,DDR प्रकाश जगताप,AR डॉ यशवंती मेश्राम, शेतकरी कृती समितीचे नेते सतीशभैया काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोदकाका काकडे, सोमेश्वर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप काकडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपदादा फरांदे व व्हाइस चेअरमन उत्तमराव आगवणे इतर मान्यवर,सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed