लाडकी बहिण योजना, नवीन सात अटी लागू…!!!
मुंबई
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जुलै २०२४ रोजी सुरू करण्यात आली होती. जुलै २५ च्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारने १२ हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर वर्ग केले,मात्र यामधून काही महिलांचा जून २५ चा १२ वा हप्ता राहिला होता अशा महिलांच्या खात्यावर आता ३००० जमा होण्यास सुरुवात झाली आहे.नुकतीच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ३६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली.
परंतु खाली दिलेल्या सात निकषात जर महिला बसत नसतील तर त्यांना जुलै २५ चा १३ वा हप्ता येणार नाही.यामध्ये
१. एकाच एकत्रित कुटुंबात फक्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
2. यासाठी पात्र महिलांसाठी ही २१वर्ष ते ६५ वर्ष ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
3. महाराष्ट्र राज्य रहिवासी असणे बंधनकारक असणार आहे.
4. एकत्र कुटुंबाची उत्पन्न मर्यादा २.५ लाख इतकी असणाऱ्या कुटुंबातील महिलाना हा लाभ घेता येणार आहे.
5. कुटुंबातील व्यक्ती/सदस्य हा सरकारी/शासकीय/महामंडळ यामध्ये कर्मचारी असल्यास अशा महिलाना लाभ घेता येणार नाही.
6. इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असल्यास हा लाभ घेता येणार नाही.उदा नमो शेतकरी सन्मान योजना.
7. राजकीय कुटुंबातील आमदार/खासदार/अध्यक्ष असणाऱ्या महिलांना तसेच ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे अशा महिलांना हा लाभ घेता येणार नाही…!!!
