पुणे जिल्ह्यात किती व कोणते किल्ले आहेत माहिती आहे का ? जाणून घेऊयात तालुका वाइज किल्ले…!!!
निंबुत
आपल्या देशाचा इतिहास किती प्रगल्भ आणि विविधतेने नटलेला आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. महाराष्ट्र हे राज्य सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. याच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील पुणे जिल्ह्यातील गड दुर्गाची सखोल माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊ…!!!
सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याची खान असलेला *मावळ* तालुका या तालुक्यामध्ये एकूण अकरा किल्ले आहेत.ते पुढीलप्रमाणे .ढाकबहिरी,तिकोना,तुंग,मनोरंजन,श्रीवर्धन, मंगरुळगड,मोरगिरी,अनघाई,लोहगड, विसापूर, इंदुरी.
*जुन्नर* तालुक्यात ही जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच अकरा किल्ले आहेत. शिंदोळा, हडसर,निमगिरी,जीवधन,चावंड, ढाकोबा, दुर्ग,जुन्नर भुईकोट, हनुमंतगड, नारायणगड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला.
*भोर* तालुक्यात केंजळगड,रोहिडा,रायरेश्वर, मोहनगड, कावळ्या.
*राजगड* वेल्हे तालुक्यातील तोरणा आणि राजगड.
*पुरंदर* छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान पुरंदर,शेजारीच लागून असणारा वज्रगड,दौलतगड,ढवळगड,जेजुरी कडेपठार, केंजळगड आणि जाधवरावगड
*हवेली* सिंहगड
*बारामती* बारामती,मेडद,सुपे,पारवाडी.
*इंदापुर* मालोजीराजे भोसले यांची गडी अशाचप्रकारे *मुळशी* मध्ये कैलासगड,घनगड,कोरीगड आणि तैलबैला.
*खेड* तालुक्यात भोरगिरी,संग्रामदुर्ग आणि वाफगाव किल्ला.
*दौंड* मलठण चा नगरकोट…!!!
मान्सून ची चाहूल लागली की निसर्गप्रेमी पर्यटकांना भ्रमंती चे वेध लागतात.अशा लोकांना निसर्गाच्या सौंदर्यात एकांतात राहायला,प्रवास करायला आवडतो. WHO तर्फे सांगण्यात येते की तुम्हाला तुमच्या रोजच्या कामातला तणाव दूर करावयाचा असेल तर निसर्गाच्या सानिध्यात भटकंती केली पाहिजे यामुळे मानसिक स्वास्थ चांगले राहते.खरं तर फॅमिली आणि मित्र परिवार घेऊन मान्सून मध्ये फिरणे हा एक ट्रेंड झाला आहे.कोरोना नंतर खऱ्या अर्थाने माणसाला आयुष्याची किंमत कळाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही…!!!
