डॉ कुलदिप काकडे निंबुत परिसरात निःस्वार्थी,दिलदार आणि गोरगरिबांना सदैव मदतीचा हात देणारे परंतु प्रसिद्धी पासून कायम अलिप्त असणारे उदयोन्मुख नेतृत्व…!!!
निंबुत,बारामती निंबुत हे बारामती तालुक्याच्या पश्चिमेला निरा नदीकाठी असलेले आणि सुरुवातीपासूनच अत्याधुनिक विचाराचारणी व सर्वधर्मसमभाव जपणारे गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असणारं गाव. तालुक्याचे पूर्वेकडून शेवटचे आणि पश्चिमेकडून पहिले यात सगळच आले बरं का ?
दिलदार आणि दानशूर राजकीय पार्श्वभूमी असलेल्या स्व भगवानदादा काकडे यांचे नातू आणि निंबुत चे माजी सरपंच चंद्रशेखर काकडे यांचे सुपुत्र व पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोदकाका काकडे यांचे पुतणे असणारे आणि डेनिस्ट क्षेत्रात नव्हे तर संपूर्ण आरोग्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर या नावाने परिचित असणारे कुलदिपभैया काकडे खरं तर यांची वेगळी ओळख सांगायची अजिबात कसलीही आवश्यकता नाही परंतु गोरगरीब नागरिक अन् पेशंट यांना आरोग्य सेवा आणि इतर गोष्टीत सर्वोतपरी मदत करण्यासाठी कायम तत्पर असणारे असे अजातशत्रू व्यक्तिमत्व…!!!
कधीही प्रसिद्धी च्या झोतात न राहता आपल्या कार्याची कायमच चुणूक ते दाखवत असतात. सर्वसामान्य जनतेमध्ये निंबुत परिसरात अतिशय आदराने त्यांचे नाव घेतले जाते. राजकारण, समाजकारण आणि आरोग्य क्षेत्रात अल्पावधीत नावारूपास आलेले एक उदयोन्मुख नेतृत्व म्हटलं तर वावग ठरणार नाही…!!!एका राजकीय व्यक्तीकडे जे गुण हवे असतात ते सर्वगुण असणारे परंतु राजकारणापासून कायम अलिप्त राहिलेले प्रचंड मित्रसंग्रह असणारे समाजसेवी, निःस्वार्थी,दिलदार अन् हसतमुख डॉ कुलदीपभैया…!!!
का कोणास ठाऊक परंतु आताच्या सर्वच क्षेत्रात प्रसिद्धीला महत्व देणाऱ्या लोकांचा जमाना असताना,यांना कसलाही प्रसिद्धीचा मोह नाही किंवा प्रसिद्धी मिळावी ही अपेक्षा न करणारे, प्रसिद्धी न आवडणारे असे कुलदीप भैया …!!!आज त्यांनी कोरेगाव ता फलटण येथून सालाबादप्रमाणे निघणाऱ्या कोरेगाव ते शिर्डी श्री साई माऊलींच्या पालखी सोहळ्यातील साईबाबांच्या चांदीच्या पादुकांसाठी ₹ १११००० रुपयांची आर्थिक मदत चेक स्वरूपात केली आहे…!!!
खरं तर दिलदारपणा त्यांच्या रक्तातच आहे तो वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला आहे परंतु कोरेगाव ता फलटण येथील महाराज यांनी सर्वप्रथम फोटो स्वरूपात प्रसिद्धी दिली आहे …!!! कोरेगाव ता फलटण येथील महाराजांनी त्यांचे आभार मानले…!!!
*साईभक्त गोवेकर महाराज*
( दिलगिरी व्यक्त करतो डॉ कुलदीप भैयांची त्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा लेख प्रसिद्धीस देत आहे. कारण ते परवानगी देणार नाहीत…!!! )

