“कृषिक २०२५” कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रात्यक्षिकाची अनुभूती…!!!

माळेगाव कृषी विज्ञान केंद्र म्हणजेच KVK अंतर्गत दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रयोगांची अनुभूती हि ठरलेलीच असते.त्यामध्ये पशुसंवर्धन विभागाचा ‘एकात्मिक शेती प्रणाली IFS” प्रयोग शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
हा शेतीपूरक उद्योग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो.
दोन मजली पत्र्याच्या शेड मध्ये शेळीपालन,कुक्कुटपालन आणि मस्त्यपालन यांचे एकत्रीत संगोपन करून दाखवले आहे.प्रत्यक्षात पाहताना हे नवीन जरी वाटत असले तरी ते किफायत शीर आणि शेतकर्यांना आर्थिक स्त्रोत वाढवणारे नक्कीच ठरणार आहे. या शेडसाठी अंदाजे खर्च हा ७५००० येवू शकतो,यामध्ये ८ शेळ्या,४० कोंबड्या आणि १०० मासे चे पालन शेतकरी करू शकतात.या शेडची १२ फुट लांबी,१० फुट रुंदी आणि १४ फुट उंची आहे – यामध्ये तळमजल्यात मासेपालन,पहिल्या मजल्यावर कुक्कुट पालन तर दुसऱ्या मजल्यावर शेळीपालन केले जाते.
यामधून शेतकऱ्याला एका धंद्यात नुकसान झाले तरी दुसऱ्या धंद्यात फायदा होऊ शकतो.दरवर्षी खर्च वजा जाता यामधून शेतकऱ्याला ७० ते ८० हजार उत्पन्न मिळू शकते.
