एन्व्हॉमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती आयोजित आज गदिमा सभागृह विद्या प्रतिष्ठान येथे आरोग्य संवाद…!!!
बारामती *एन्व्हॉमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती आयोजित प्रतिबिंब अंतर्गत आज गदिमा सभागृह विद्या प्रतिष्ठान बारामती येथे सायंकाळी ६ वाजता आरोग्य संवाद स्वस्थ मानसिक आणि शारीरिक स्वास्थ याविषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे…!!!
*दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ प्रसाद राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली न्यूरोलॉजिस्ट डॉ राहुल कुलकर्णी, डॉ अश्विनी जोशी व डॉ वैभवी उपाध्ये या तद्न्य मान्यवरांचे विचार आणि मार्गदर्शन लाभणार आहे.विस्मृतीचे आजार आणि ते टाळण्याचे मार्ग या विषयावर डॉ राहुल कुलकर्णी हे, वाढता मधुमेह आणि आवश्यक जीवन पद्धत या विषयावर डॉ अश्विनी जोशी तसेच जीवनरेखा प्राथमिक उपचार पद्धती या विषयावर डॉ वैभवी उपाध्ये हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत…!!!
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वस्थ मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे सर्वासाठी आवश्यक आहे परंतु सर्वच नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते हाच महत्त्वाचा आजचा विषय असणार आहे…!!! यासाठी बारामती परिसरातील नागरिकांनी या आरोग्य संवाद कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजनकर्ते एन्व्हॉमेंटल फोरम ऑफ इंडिया NGO बारामती यांनी केलेले आहे…!!!
